advertisement

Success Story : गावातील महिला बनली उद्योजिका, माशांपासून बनवते विविध पदार्थ, आता लाखात कमाई

Last Updated:
गेल्या वर्षभरात त्यांनी मासे लोणचे, चकली, शेव, पापड अशा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांद्वारे स्वतःचा वेगळा ब्रँड तयार केला आहे.
1/5
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील वैसपूर या छोट्याशा गावात दुर्गा बिरोटे यांनी सुरू केलेला मत्स्य मूल्यवर्धनाचा उपक्रम सध्या मत्स्य क्रांतीचे उदाहरण म्हणून पाहिला जात आहे. पारंपरिक मासेमारी किंवा केवळ ताज्या माशांच्या विक्रीपुरते न थांबता, त्यांनी माशांपासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांचा व्यवसाय उभारला आहे.

2/5
गेल्या वर्षभरात त्यांनी मासे लोणचे, चकली, शेव, पापड अशा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांद्वारे स्वतःचा वेगळा ब्रँड तयार केला आहे. घरगुती चव, स्वच्छता आणि दर्जा यामुळे त्यांच्या उत्पादनांना बाजारात मोठी पसंती मिळत असून, ग्रामीण भागातही नाविन्यपूर्ण व्यवसाय कसा उभा राहू शकतो याचा हा उत्तम नमुना ठरत आहे.

3/5
दुर्गा बिरोटे यांच्या या उपक्रमात सध्या एकूण 13 महिला एकत्र काम करत आहेत. या महिलांसाठी हा व्यवसाय केवळ रोजगाराचा स्रोत नसून आत्मनिर्भरतेकडे नेणारा मार्ग ठरला आहे. सर्व पदार्थ बनवताना माशांची निवड, स्वच्छता आणि प्रक्रिया याकडे विशेष लक्ष दिले जाते. मासे व्यवस्थित धुऊन त्यावरील काटे आणि अनावश्यक भाग काढून टाकले जातात. त्यानंतर पारंपरिक मसाल्यांचा वापर करून पदार्थ तयार केले जातात. अद्रक, लसूण, मोहरी, हिरवी मिरची, मीठ आणि हळद यांचा संतुलित वापर केल्यामुळे लोणच्याला खास चव आणि टिकाऊपणा मिळतो. या व्यवसायातून महिलांना नियमित उत्पन्न मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल होत आहे.

4/5
मासे लोणचे कसे तयार करावे याबाबत दुर्गा बिरोटे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रथम मासे स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे छोटे तुकडे करायचे. त्या तुकड्यांवर अद्रक-लसूण पेस्ट लावून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे, जेणेकरून मसाला माशांमध्ये चांगला मुरतो. त्यानंतर गरम तेलात हे तुकडे तळून घेतले जातात. तळणी झाल्यावर लोणच्याचा खास मसाला, मोहरी, हळद, मीठ आणि मिरची पावडर मिसळून लोणचे तयार केले जाते. ही प्रक्रिया घरगुती पातळीवर किंवा हॉटेल व्यवसायासाठीही सहज करता येऊ शकते, असे दुर्गा बिरोटे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

5/5
याशिवाय मासे चकली आणि शेव ही दुर्गा बिरोटे यांच्या व्यवसायाची आणखी एक खास ओळख बनली आहे. यासाठी उकडलेले मासे घेऊन त्यातील काटे पूर्णपणे काढून टाकले जातात आणि ते चकली पीठ किंवा बेसन पिठात मिसळले जातात. त्यानंतर नेहमीप्रमाणे चकली किंवा शेव तयार केली जाते. हे पदार्थ लहान मुलांसाठी विशेष पौष्टिक ठरतात, कारण माशांतील पोषक घटक मिळतात आणि काट्यांची अडचण राहत नाही. आम्ही 13 महिला मिळून हा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहोत, इतर महिलांनीही पुढे येऊन अशा प्रकारच्या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन बिरोटे केले.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement