कूलर लावलाय ना? लगेच करा हे जुगाड; ACहून जास्त मिळेल कूलिंग, वीजही वाचेल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि आता घरोघरी कूलर एसी ऑन होण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी कूलर लावून घर एसीसारखं गारेगार करायचं असेल तर काही टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत.
advertisement
advertisement
कूलरमध्ये थंड पाणी किंवा बर्फ टाका : कूलरची हवा जास्त थंड करण्याचा सोपा उपाय म्हणजे टँकमध्ये थोडं गार पाणी टाका. तुम्ही सामान्य पाण्याऐवजी बर्फाचे तुकडे किंवा गार पाणी टाकले तर येणारी हवा जास्त थंडी असेल. तुम्ही यासाठी बाजारात मिळणाऱ्या आइस पॅकचाही वापर करु शकता. हे देखील कूलरची कूलिंग वाढवण्यात मदत करते.
advertisement
खोलीत योग्य व्हेंटिलेशन ठेवा : ज्यावेळी तुमच्या खोलीतील हवा खेळती राहते तेव्हाच कूलर चांगलं काम करते. खोली पूर्णपणे बंद असेल तर कूलरच्या हवेने ओलावा वाढू शकतो आणि गुदमरल्यासारखं होऊ शकतं. यामुळे कूलर नेहमी खिडकी किंवा दरवाज्याजवळ ठेवा. जेणेकरुन बाहेरची ताजी हवा आत ओढू शकेल. सोबतच खोलीच्या दुसऱ्या बाजूला एक खिडकी किंवा वेंट ओपन ठेवा. जेणेकरुन गरम आणि ओली हवा बाहेर पडू शकेल. याला क्रॉस-व्हेंटिलेशन म्हणतात आणि यामुळे कूलरच्या कूलिंगवर पॉझिटव्ह परिणाम होतो.
advertisement
कूलिंग पॅड्स स्वच्छ ठेवा : कूलरमध्ये लावलेले कूलिंग पॅड खुप गरजेचे असतात. हे पॅड पाणी शोषूण हवेला गार करण्याचे काम करते. हे पॅड खराब झाले किंवा यात धूळ भरली गेली तर कूलरची कूलिंग कमी होते. यामुळे दर 10 ते 15 दिवसांमध्ये कूलिंग पॅड्स काढून चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. पॅड खुप जुने झाले किंवा खराब झाले तर त्यांना बदलणं योग्य ठरतं. सोबतच हेही लक्षात ठेवा की, पाण्याचा फअलो पॅड्सवर योग्यरित्या पडायला हवा. जेणेकरुन ते नेहमी ओले राहतील आणि चांगला गारवा मिळू शकेल.
advertisement
कुलर योग्य ठिकाणी ठेवा - कुलरचा थंड होण्याचा परिणाम घरात कुठे ठेवला आहे यावरही अवलंबून असतो. कुलर थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असलेल्या ठिकाणी ठेवला असेल तर तो उबदार हवा ओढेल आणि कमी गारवा देईल. म्हणून, कुलर नेहमी सावलीच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. कुलर खिडकीवर ठेवण्याची आवश्यकता असेल तर थेट सूर्यप्रकाश कुलरवर पडू नये म्हणून खिडकीच्या बाहेर पडदा किंवा सावली लावा.
advertisement
पख्याची योग्य स्पीड आणि पाण्याचा फ्लो योग्य ठेवा - बरेच लोक विचार करतात की, कूलर पूर्ण वेगाने चालवल्याने जास्तीत जास्त गारवा मिळेल, परंतु हे खरे नाही. कधीकधी, मध्यम गतीचा कूलर देखील चांगला गारवा देतो आणि आर्द्रता कमी करतो. म्हणून, हवामान आणि खोलीच्या आकारानुसार पंख्याची स्पीड आणि पाण्याचा फ्लो अॅडजस्ट करणे महत्वाचे आहे.
advertisement
एसी वापरताना राहा सावध : तुम्ही एसीचा वापर करत असाल तर त्याचे तापमान 24 ते 26 डिग्रीच्या दरम्यान ठेवा. अनेक लोक एसीला 18 किंवा 20 डिग्रीवर चालवतात. ज्यामुळे वीज जास्त वाढते. या व्यतिरिक्त एसीसह पंखा चालवल्यानेही खोली लवकर गार होते आणि एसीवर जास्त दबाव पडत नाही. प्रत्येक 15 दिवसात एसीचा एयर फिल्टर स्वच्छ करणेही गरजेचे आहे. कारण खराब फिल्टर वीज वापर वाढवते.








