वर्ल्डकप विजयानंतर सूर्याने दिली मोठी खुशखबरी, कॅप्टन बाबा होणार,देविशाच्या बेबी शॉवरचा VIDEO समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा कॅप्टन लवकरच बाबा होणार आहे.कारण सूर्यकुमार यादवची बायको देविशा शेट्टीचा बेबी शॉवर(डोहाळे जेवण) पार पडला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव लवकरच बाबा होणार आहे.
Suryakumar Yadav and Devisha Baby shower VIDEO : टीम इंडियाने नुकताच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी20 वर्ल्डकप जिंकला आहे.या विजयानंतर भारतीय फॅन्स सुखावले आहेत. अशात आता कॅप्टन सूर्यकुमार यादवने त्याच्या चाहत्यांना आणखी एक खुशखबरी दिली आह.टीम इंडियाचा कॅप्टन लवकरच बाबा होणार आहे.कारण सूर्यकुमार यादवची बायको देविशा शेट्टीचा बेबी शॉवर(डोहाळे जेवण)
पार पडला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव लवकरच बाबा होणार आहे.
खरं तर सूर्यकुमार यादव वर्ल्ड कप विजयानंतर सध्या ट्रॉफी अनेक ठिकाणी फिरतो आहे. आज तो ट्रॉफी घेऊन दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर आणि आयसीसीचे अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव संध्याकाळी CNBC TV18 च्या इडिया बिझनेस लीडर्स अवॉर्ड सोहळ्याला देखील पोहोचला होता.येथे त्याचा सत्कारही करण्यात आला होता.
advertisement
Baby shower of Suryakumar Yadav and Devika 😍❤️ pic.twitter.com/rYudGduOPE
— Jeet (@JeetN25) March 14, 2026
दरम्यान सूर्यकुमार यादव जरी वर्ल्डकपमधून मोकळा झाला असला तरी सध्या तो व्यस्तच आहे.या दरम्यानच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव आणि त्याची बायको एका हॉलमध्ये येताना दिसत आहे. मागच्या अनेक दिवसांपासून देविषा शेट्टी ही प्रेग्नेट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्याची पुष्टी होत नव्हती. पण आता बेबी शॉवरचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सूर्याकुमार यादवची बायको प्रेग्नेंट असल्याचे समोर आले आहे. सूर्या आणि त्याच्या बायकोच्या बेबी शॉवरचा व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
दरम्यान हा व्हिडिओ पाहून टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव लवकरच बाबा होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या घरात लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे.त्यामुळे सूर्यकुमार यादव प्रचंड आनंदात आहेत.तसेच ही खुशखबरी मिळाल्याने त्याचे चाहते देखील सुखावले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 10:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्डकप विजयानंतर सूर्याने दिली मोठी खुशखबरी, कॅप्टन बाबा होणार,देविशाच्या बेबी शॉवरचा VIDEO समोर










