Induction : गॅसच्या टंचाईमुळे इंडक्शन खरेदीची घाई करताय? थांबा! 'या' 10 चुका पडतील महागात; खरेदीपूर्वी हे नक्की वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
घाईघाईत इंडक्शन खरेदी करताना आपण अनेकदा अशा चुका करतो ज्याचा फटका नंतर खिशाला आणि मनस्तापाला बसतो. जर तुम्हीही नवीन इंडक्शन घेण्याच्या विचारात असाल, तर या 10 महत्त्वाच्या चुका टाळणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
मुंबई : हल्ली बातम्यांपासून ते आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारण्यापर्यंत एकच चर्चा लोकांमध्ये आहे ती म्हणजे गॅस सिलिंडर, अनेकांना गॅसचा वेळेवर पुरवठा होत नाही म्हणून वाट पाहाण्याची वेळ आली आहे. तर अनेक हॉटेल्स आणि खानावळी, तसेच लहानमोठे स्टॉल्स बंद झाले आहेत. त्यामुळे हे सगळं कधी पूर्ववत होईल अशी वाट सर्वसामान्य लोक पाहात आहेत. मध्यपूर्वेतील तणाव आणि 'स्ट्रोट ऑफ होर्मुज'मधील विस्कळीत पुरवठ्यामुळे गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्या आहेत. सरकार म्हणतंय पुरवठा सुरळीत आहे, पण सुरक्षितता म्हणून अनेकजण आता 'पर्यायी' इंधनाकडे वळले आहेत. यामुळेच सध्या बाजारात आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर इंडक्शन कुकटॉप खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये झुंबड उडाली आहे. अनेक ठिकाणी तर स्टॉक संपल्याचे बोर्ड लागले आहेत.
पण, घाईघाईत इंडक्शन खरेदी करताना आपण अनेकदा अशा चुका करतो ज्याचा फटका नंतर खिशाला आणि मनस्तापाला बसतो. जर तुम्हीही नवीन इंडक्शन घेण्याच्या विचारात असाल, तर या 10 महत्त्वाच्या चुका टाळणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
1. पॉवर रेटिंगकडे दुर्लक्ष करणे:
कमी वॅट (Watt) असलेले इंडक्शन स्वस्त मिळतात, पण त्यात स्वयंपाक व्हायला खूप वेळ लागतो. नेहमीच्या वापरासाठी 1800W ते 2000W क्षमतेचे मॉडेल उत्तम मानले जाते, ज्यामुळे स्वयंपाक झटपट होतो.
advertisement
2. भांड्यांची तपासणी न करणे:
इंडक्शनवर प्रत्येक भांडं चालत नाही. ज्या भांड्याला चुंबक चिकटतं (उदा. स्टेनलेस स्टील किंवा कास्ट आर्यन), तीच भांडी इंडक्शनवर चालतात. ॲल्युमिनियम किंवा तांब्याची भांडी यावर चालणार नाहीत. त्यामुळे खरेदीपूर्वी तुमच्याकडे 'इंडक्शन फ्रेंडली' भांडी आहेत का, हे तपासा.
3. चुकीचा आकार निवडणे:
तुमच्या किचन ओट्यावर किती जागा आहे, याचा अंदाज न घेता कुकटॉप खरेदी करू नका. गरजेनुसार आणि जागेनुसार योग्य आकाराची निवड करा.
advertisement
4. प्रीसेट कुकिंग मोड न पाहणे:
दूध उकळणे, भात शिजवणे किंवा तळणे (Fry) यासाठी इंडक्शनमध्ये खास 'प्रीसेट मोड' असतात. हे फीचर्स असल्यास तुमचे काम सोपे होते आणि वीजही वाचते.
5. मॅन्युअल टेम्परेचर कंट्रोलची कमतरता:
ज्या कुकटॉपमध्ये तापमानाचे जास्त लेव्हल्स (Settings) असतात, तिथे तुम्ही हव्या त्या तापमानावर पदार्थ शिजवू शकता. केवळ 2-3 लेव्हल असलेल्या मॉडेल्समध्ये स्वयंपाकावर नियंत्रण राहत नाही.
advertisement
6. सेफ्टी फीचर्सकडे डोळे झाक:
इंडक्शन घेताना 'ऑटोमॅटिक शट-ऑफ' (Automatic Shut-off), ओव्हरहीटिंग प्रोटेक्शन आणि 'चाइल्ड लॉक' यांसारखे फीचर्स असणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.
7. एनर्जी एफिशिएंसी (वीज बचत):
इंडक्शन वीज वाचवण्यासाठीच ओळखले जातात, पण प्रत्येक मॉडेलची क्षमता वेगळी असते. खरेदी करताना त्याचे 'पॉवर मॅनेजमेंट' कसे आहे, हे आवर्जून पहा.
8. कंट्रोल पॅनलची निवड:
टच कंट्रोल असलेले इंडक्शन साफ करायला सोपे असतात, पण बटण (Tactile Buttons) असलेले मॉडेल ओल्या हातांनीही सहज वापरता येतात. तुमच्या सोयीनुसार योग्य निवड करा.
advertisement
9. ब्रँड आणि सर्विस नेटवर्क:
केवळ स्वस्त मिळतोय म्हणून कोणताही ब्रँड घेऊ नका. भविष्यात बिघाड झाल्यास तुमच्या शहरात त्याचे सर्व्हिस सेंटर आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
10. केवळ किंमत पाहणे:
कमी किंमत पाहून निकृष्ट दर्जाचे इंडक्शन घेतल्यास ते लवकर खराब होऊ शकते. फीचर्स, वॉरंटी आणि क्वालिटी या तिन्ही गोष्टींचा विचार करूनच योग्य किंमत मोजा.
advertisement
गॅसचा तुटवडा ही तात्पुरती समस्या असू शकते, पण इंडक्शन हा तुमच्या किचनमधील कायमस्वरूपी सोबती आहे. त्यामुळे घाईत निर्णय न घेता, वरील मुद्द्यांचा विचार करूनच गुंतवणूक करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 10:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Induction : गॅसच्या टंचाईमुळे इंडक्शन खरेदीची घाई करताय? थांबा! 'या' 10 चुका पडतील महागात; खरेदीपूर्वी हे नक्की वाचा










