advertisement

Mumbai: 4 जण गुपचूप विमानात बसणार होते, पण बॅगा उघडल्यावर सगळे पाहतच राहिले, मुंबई विमानतळावरची घटना

Last Updated:

मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे.

News18
News18
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई: मुंबई विमानतळावर तस्करीच्या घटनांमध्ये काही केल्या कमी होत नाही. आठवडा, महिन्याला मोठ्या प्रमाणात तस्करीने आणलेलं सोनं, हिरे आणि ड्रग्स जप्त केले जात आहे. अशातच (DRI) मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई केली आआहे. या कारवाईत डॉलर्स, पाउंड स्टर्लिंग आणि हिरे असा सुमारे ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे.  विशेष गुप्त माहितीच्या आधारावर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी निघालेल्या ४ प्रवाशांना अडवण्यात आलं. जेव्हा या प्रवासांच्या  सामानाच्या तपासणी केली असता हँडबॅगमध्ये बनवलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये परकीय चलन लपवलेलं आढळलं.  यामध्ये पाउंड स्टर्लिंग (GBP) आणि अमेरिकन डॉलर्स (USD) मिळून सुमारे १.९३ कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.
advertisement
एवढंच नाहीतर  या चारही प्रवाशांच्या बॅगेतून ५३ छोट्या पाउचमध्ये ठेवलेले हिरे आढळले.  जप्त केलेल्या हिऱ्यांची अंदाजे किंमत १.१० कोटी रुपये असल्याची सांगण्यात आली आहे.  प्रवाशांनी परकीय चलन आणि हिरे कस्टम्स विभागाकडे घोषित केले नव्हते.  एवढ्या मोठ्या प्रमाणात चलन आणि हिरे निर्यात करण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे या चारही प्रवाशांकडे आढळली नाहीत.
advertisement
या प्रकरणी अधिक तपास केला असता हवाला ऑपरेटर आणि चलन पुरवणारी व्यक्तीचा ठावठिकाणा मिळाला. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे. हवाला ऑपरेटरसह एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.   कस्टम्स कायदा १९६२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  देशाच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या हवाला आणि तस्करीच्या जाळ्यावर DRI ची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: 4 जण गुपचूप विमानात बसणार होते, पण बॅगा उघडल्यावर सगळे पाहतच राहिले, मुंबई विमानतळावरची घटना
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement