Summer Care : कडक उन्हात करा त्वचेचं रक्षण, सोप्या आणि उपयुक्त टिप्स पडतील उपयोगी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स नियमित वापरल्या तर उन्हाळा सुसह्य जाईल. सर्वात आधी बाहेर जाण्याची वेळ ठरवण्याची वेळ ऊन कमी असतानाची ठेवण्याचा प्रयत्न करा. जाणं अपरिहार्य असेल तर इथे दिलेल्या टिप्स लक्षात ठेवा.
मुंबई : उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्यात. या तीव्र उन्हाच्या चटक्यांपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी काही मोलाच्या टिप्स.
त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स नियमित वापरल्या तर उन्हाळा सुसह्य जाईल. सर्वात आधी बाहेर जाण्याची वेळ ठरवण्याची वेळ ऊन कमी असतानाची ठेवण्याचा प्रयत्न करा. जाणं अपरिहार्य असेल तर इथे दिलेल्या टिप्स लक्षात ठेवा.
सनस्क्रीन - कामासाठी बाहेर जायचं असेल, तर त्वचेला टॅनिंग, सनबर्न आणि कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी दररोज किमान एसपीएफ 30+ असलेलं सनस्क्रीन चेहऱ्यावर, हातांवर आणि पायांवर लावावं.
advertisement
पुरेसं पाणी - उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण राखणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून दिवसभरात किमान तीन ते चार लीटर पाणी प्या.
फळं - उन्हाळ्यात तुमच्या आहारात पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं खाण्यावर भर द्या.
सुती कपडे - तीव्र उन्हात बाहेर जाता तेव्हा उष्णता कमी करण्यासाठी हलक्या रंगाचं सुती कपडे घालण्याचा प्रयत्न करा. तसंच, बाहेर जाताना स्कार्फ, टोपी, गॉगल किंवा छत्री न्यायला विसरु नका.
advertisement
advertisement
भर उन्हात बाहेर जाऊ नका - तीव्र सूर्यप्रकाशात जाणं टाळा, विशेषतः दुपारी बारा ते चार या वेळेत उन्हात जाणं टाळा. यामुळे त्वचेला टॅनिंग, सनबर्न आणि त्वचा कोरडी होणं असे त्रास जाणवू शकतात.
टॅनिंग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय लक्षात ठेवता येतील. उन्हामुळे टॅनिंग झालं असेल तर त्वचेवर कोरफडीचा गर, दही, काकडी किंवा टोमॅटोचा रस वापरू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 11:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Care : कडक उन्हात करा त्वचेचं रक्षण, सोप्या आणि उपयुक्त टिप्स पडतील उपयोगी