advertisement

Thar कशाला घेता? थेट Audi चं घेऊन टाका! येतेय सगळ्यात स्वस्त आणि मस्त A2 Car

Last Updated:

ही एक इलेक्ट्रिक कार असल्यामुळे आतामध्ये भरपूर असा स्पेस असणार आहे. केबिनमध्ये चांगली जागा मिळणार आहे. बॅटरी आणि रेंजही उत्तम मिळणार आहे.

News18
News18
इंधन आणि प्रदुषणामध्ये वाढ होत असल्यामुळे जगासमोर आता ईलेक्ट्रिक वाहनं हा एक सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून जवळपास सगळ्या वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनं उत्पादनात उडी घेतली आहे. अशातच लक्झरी आणि आलिशान कार उत्पादन कंपनी  Audi ने आता इलेक्ट्रिक बाजारात स्वस्तात मस्त अशी कार  आणण्याच्या तयारीत आहे. Audi ने आपली लोकप्रिय हॅचबॅक सीरिजमधील  A2 कार आता ईलेक्ट्रिक रुपामध्ये लाँच करणार हे निश्चित झालं आहे. कंपनीकडून टिझर सुद्धा रिलीज केला आहे.
Audi A2 ही एक हॅचबॅक कार असून 1999 मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. ही कार कमी इंधन आणि हलक्या वजनामुळे स्पेशल अशीच होती. त्यामुळे या कारची विक्रीही सर्वाधिक होती. आता Audi पुन्हा एकदाा A2 हे नाव वापरून इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे.  पण ही A2 कार इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर बेस असणार आहे.  A2 फॉक्सवॅगनच्या Volkswagen) MEB प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे, ज्यावर सध्या अनेक इलेक्ट्रिक गाड्या बनवल्या जात आहेत. ही कार हॅचबॅक आणि क्रॉसओव्हरचं मिश्रण असणार आहे. जी Audi ची एंट्री लेव्हल मॉडेल असेल.
advertisement
किंमत किती असणार?
Audi A2 ची किंमत कंपनीने अजून जाहीर केली नाही. पण, ही एक इलेक्ट्रिक कार असल्यामुळे आतामध्ये भरपूर असा स्पेस असणार आहे. केबिनमध्ये चांगली जागा मिळणार आहे. बॅटरी आणि रेंजही उत्तम मिळणार आहे. फिचर्सची माहिती अद्याप कंपनीने उघड तर केली नाही, पण ही ऑडीची आतापर्यंतची सगळ्यात स्वस्त अशी कार राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारची किंमत जवळपास ३० लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
advertisement
भारतात कधी होणार लाँच? 
Audi A2 ही नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच होण्याच्या तयारीत आहे. आता प्रश्न असा आहे की, भारतात कधी लाँच होणार? भारतात Audi ची मागणी ही एका क्लासपर्यंत मर्यादीत आहे. पण, Audi A2 ही आता कमी किंमतीत भारतात लाँच होणार आहे. याआधी Audi Q2 ही सगळ्यात स्वस्त अशी कार होती. पण, कालांतराने ती बंद झाली. भारतात फार अशी हॅचबॅकची मागणी नाही. त्यामुळे ती बंद झाली. आता याच लाईनअपमध्ये Audi A2 येणार आहे. सध्या युरोप आणि काही निवडक देशांमध्ये ही कार लाँच होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Thar कशाला घेता? थेट Audi चं घेऊन टाका! येतेय सगळ्यात स्वस्त आणि मस्त A2 Car
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement