सोशल मीडिया युट्युबवर एका व्हिडिओमध्ये ही पास्ता रेसिपी दाखवली गेली आहे. शेफने पास्ता बनवण्याची सर्वात सोपी पद्धत सांगितली आहे. शेफच्या या युक्तीने तुम्ही फक्त 15 मिनिटांत व्हाईट सॉस पास्ता बनवू शकता. विशेष म्हणजे हा पास्ता खूप क्रिमी बनेल आणि तोही मैद्याशिवाय.
चीझी क्रिमी पास्ता बनवण्यासाठी साहित्य..
तेल
लसूण
ओरेगॅनो
चिली फ्लेक्स
advertisement
चिरलेला कांदा
पिवळी शिमला मिरची
लाल शिमला मिरची
हिरवी शिमला मिरची
बेबीकॉर्न
पाणी
थंड दूध
चीज क्यूब
मीठ
मिक्स हर्ब्स
असा बनवा इन्स्टंट पास्ता..
- सर्वात आधी गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवा.कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाका.
- तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, चिरलेला कांदा, पिवळी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची आणि बेबीकॉर्न टाका.
- या सर्वांना हाय फ्लेमवर परतून घ्या. हाय फ्लेमवर परतल्याने ते कुरकुरीत राहतात आणि खूप चांगला फ्लेवर येतो.
- 2 मिनिटं परतल्यानंतर या भाजाय प्लेटमध्ये काढून घ्या.
- त्यानंतर कुकरमध्ये पास्ता टाका. त्यानंतर यामध्ये एक कप पाणी आणि 2 कप थंड दूध टाका.
- आता कुकरचं झाकण बंद करून हाय फ्लेमवर एक शिट्टी येईपर्यंत शिजवा.
- त्यानंतर लो गॅसवर हे कुकर 4 ते 5 मिनिटं ठेवा. यानंतर हे शिजेल.
- त्यानंतर कुकरचं झाकण उघडा आणि पिस्त्याची ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवा.
- त्यानंतर त्यामध्ये चीज क्यूबचे तुकडे करून टाका. याने पास्ता चिजी आणि क्रिमी होईल.
- आता यामध्ये परतलेल्या भाज्या आणि थोडी काळी मिरी टाका.
- त्यानंतर पास्तामध्ये मीठ आणि मिक्स हर्ब्स टाका.
शेवटी पास्ता पुरेसा घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. हा पास्ता खूप कमी वेळात आणि अगदी चीझी क्रिमी बनून तयार होतो. मुलांना हा पास्ता नक्की आवडेल. तेव्हा दुपारच्या छोट्या भुकेसाठी हा नक्की बनवून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
