TRENDING:

Banana Gulabjam : घरात पिकलेली केळी उरलीय? बनवा टेस्टी आणि हेल्दी केळीचे गुलाबजाम! पाहा रेसिपी

Last Updated:

जास्त पिकलेली केळी खायला सर्वजण कंटाळा करतात. पण जर तुम्हाला सांगितलं की, याच केळीचे तुम्ही गुलाबजाम बनवू शकता तर..?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : घरात आणलेल्या फळांपैकी केळी असं फळ आहे, जे खूप लवकर खराब होऊ शकतं किंवा मग केळी पिकायला तरी लवकर लागतात. जास्त पिकलेली केळी खायला सर्वजण कंटाळा करतात. पण जर तुम्हाला सांगितलं की, याच केळीचे तुम्ही गुलाबजाम बनवू शकता तर? तर सर्वांनाच हे गुलाबजाम खायला नक्की आवडतील.
असे बनवा केळीचे गुलाबजाम..
असे बनवा केळीचे गुलाबजाम..
advertisement

केळीचे गुलाबजाम बनवण्याची रेसिपी तशी सोपीच आहे. याला खव्याच्या गुलाबजाम इतका जास्त वेळ लागणार नाही, पण थोडासा लागेल. या गुलाबजामची रेसिपी nishacookingvlog या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली गेली आहे.

केळीचे गुलाबजाम बनण्यासाठी साहित्य..

- केळी

- दूध

- साखर

- रवा

- वेलची

- केशर

- साखर

- पाणी

असे बनवा केळीचे गुलाबजाम..

advertisement

- दोन पिकलेली केळी घ्या. त्यांची साल काढून तुकडे करा आणि मिक्सरच्या जरमध्ये टाका.

- यामध्ये अर्धा कप दूध टाका आणि मिक्सरला फिरवून त्याची मऊसूत पेस्ट बनवून घ्या.

- त्यानंतर कढईमधे केळींची पेस्ट आणि अर्धा कप दूध घाला.

- हे मिश्रण छान सतत ढवळत बॉईल करून घ्या.

- त्यानंतर यामध्ये साखर आणि वेलचीपूड टाकून व्यवस्थित मिक्स करा.

advertisement

- साखर विरघल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप रवा टाका.

- त्यानंतर मिश्रण घट्ट झाल्यावर आणि पॅनल सोडू लागल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या.

- आता एका भांड्यामधे साखर टाका. त्यामध्ये पाणी, केशराच्या काड्या आणि वेलचीपूड घालून पाक बनवून घ्या.

- केळी आणि रव्याचं मिश्रण आता थंड झालं असेल तर त्यामध्ये एक चमचा तूप टाका.

advertisement

- यानंतर त्या मिश्रणाचे गुलाबजाम सारखे गोळे बनवून घ्या नाही तुम्हाला आवडेल तसा आकार द्या.

- आता गॅसवर एका कढईमधे तेल टाका आणि ते चांगलं गरम करून घ्या.

- तेल गरम झाल्यावर गॅस कमी करा आणि त्यामध्ये हे बनवलेले केळी रव्याचे गोळे घाला.

- हे गोळे तेलामध्ये हलक्या हाताने गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्या.

advertisement

- तळल्यानंतर हे गुलाबजाम गरमागरम पाकमध्ये सोडा.

आता तुमचे हे केळी आणि रव्याचे गुलाबजाम तयार आहेत. हे इतपर्यंत शिजतात आणि मूर्तता. तसेच खूप सॉफ्ट आणि स्पॉंजी बनतात. हे गुलाबजाम लहान मुलांनाही खूप आवडतील. मुख्य म्हणजे घरातली पिकलेली केळी वाया जाणार नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Banana Gulabjam : घरात पिकलेली केळी उरलीय? बनवा टेस्टी आणि हेल्दी केळीचे गुलाबजाम! पाहा रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल