TRENDING:

Weight Loss च्या प्रवासात गोड मानून घ्या हे कडू पण करामती कारलं!

Last Updated:

कारलं खाण्याचे फायदे वाचलेत तर तुम्हीही ही कडू भाजी गोड मानून घ्याल. कारण कारलं पचनसंंस्था सुधारतेच पण त्याबरोबर तुमच्या weight loss च्या प्रयत्नांनाही मदत करते. कारल्याच्या आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने असलेल्या महत्त्वाविषयी आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिमरनजीत सिंग
News18
News18
advertisement

शाहजहांपूर : कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच ही मराठी म्हण खरी असली तरी या कडवटपणाचे खूप सारे फायदे आहेत. आरोग्याच्या दृृष्टीने कारलं हे बहुगुणी मानलं जातं. कारलं चवीला कडू असलं तरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी विविध प्रकारे लाभदायक ठरतात. कारलं रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतं आणि पचनक्रियेला सुधारतं. यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

advertisement

कारलं खाण्याचे फायदे वाचलेत तर तुम्हीही ही कडू भाजी गोड मानून घ्याल. कारण कारलं पचनसंंस्था सुधारतेच पण त्याबरोबर तुमच्या weight loss च्या प्रयत्नांनाही मदत करते. कारल्याच्या आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने असलेल्या महत्त्वाविषयी आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली.

कारलं खाण्याचे फायदे काय आहेत?

कृषी विज्ञान केंद्र नियामतपूरच्या गृह विज्ञान तज्ज्ञ डॉ. विद्या गुप्ता यांनी लोकल 18 ला सांगितले की, कारल्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, पोटॅशियम, झिंक आणि हायपोग्लाइसेमिक यांसारखे अनेक पोषक तत्वं असतात. यामध्ये जीवाणू प्रतिरोधक, अँटीव्हायरल आणि कर्करोगविरोधी गुणधर्मही आढळतात.

advertisement

कारलं कोणत्या आजारांवर प्रभावी आहे?

नियमितपणे कारलं खाल्ल्याने अस्थमा, श्वसनाचे आजार, हृदयरोग, किडनी, लिव्हर आणि पचनसंस्थेच्या समस्यांवर लाभ होतो. तसेच, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे.

संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण

कारल्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे तुम्ही विविध प्रकारच्या संक्रामक रोगांपासून सुरक्षित राहू शकता. यातील व्हिटॅमिन एमुळे डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.

advertisement

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

कारल्यामध्ये कमी कॅलरीज आणि अधिक फायबर असल्याने ते वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. हे वारंवार लागणारी भूक कमी करते आणि पचनक्रियेला गती देतं. त्यामुळे पोट आणि पचनसंस्था निरोगी राहते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss च्या प्रवासात गोड मानून घ्या हे कडू पण करामती कारलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल