TRENDING:

Health Tips : एवढीशी मटकी, पण फायदे तिचे भारी; आरोग्यासाठी आहे खूपच गुणकारी

Last Updated:

कडधान्यं हा प्रोटीन्सचा मोठा स्रोत आहे. मटकी यासारखी छोटी कडधान्य पचायला देखील हलकी असतात तेव्हा दररोजच्या आहारात मटकीचे सेवन करण्याचे फायदे जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कडधान्यं हा प्रोटीन्सचा स्रोत असल्याने आहारात असणं अत्यंत गरजेचं असतं, याची आपल्याला कल्पना आहेच. त्यातही शाकाहारी व्यक्तींच्या आहारात कडधान्यं मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक असतं. कारण त्यांची प्रथिनांची गरज अन्य मार्गांनी पूर्ण होत नाही. मोठी कडधान्यं पचायला जड असतात; मात्र मूग, मटकी यांसारखी छोटी कडधान्यं त्या तुलनेत पचायला हलकी असतात. मटकीचे शरीराला अनेक उपयोग होतात. त्या उपयोगांबद्दल अनेक पोषणतज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहू या.
एवढीशी मटकी, पण फायदे तिचे भारी; आरोग्यासाठी आहे खूपच गुणकारी
एवढीशी मटकी, पण फायदे तिचे भारी; आरोग्यासाठी आहे खूपच गुणकारी
advertisement

ब्रिटनमधील ख्रिस्तॉस सिटास यांनी न्यूट्रिशन अँड एक्सरसाइज सायन्सेसमध्ये एमएस्सी केलं असून, त्यांना तीन वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या मते, मटकीमध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्याने मटकी खाल्ल्यानंतर लगेच भूक लागत नाही. भूक नियंत्रित झाल्याने वजन कमी करण्यास उपयोग होतो. नॉन हेमिक आयर्न, फोलेट, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, थायमिन, पँटोथेनिक अ‍ॅसिड आदी अन्नद्रव्यं त्यात मोठ्या प्रमाणावर असतात.

advertisement

ब्राझीलच्या लिव्हिया डिक्सन चेन यांनी न्यूट्रिशन या विषयात पीएचडी केली असून, त्यांना 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मटकी हाडांच्या मजबुतीसाठी साह्य करते. कॅल्शिअम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्याने ऑस्टिओपोरॉसिसला प्रतिबंध करण्यात आणि त्याच्याशी लढा देण्यात मटकी साह्यभूत ठरते. मटकी रोगप्रतिकार यंत्रणेत सुधारणा करते. त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या झिंकचा मटकी हा उत्तम स्रोत आहे. मसल्स अर्थात स्नायू कमावण्यासाठी आणि दुखावलेले स्नायू बरे होण्यासाठी मटकीचा उपयोग होऊ शकतो. कारण मटकीतलं प्रथिन त्यासाठी उत्तम काम करतं. शाकाहारी व्यक्तींसाठी मटकी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.

advertisement

Kidney Disease : किडनी विकारांच्या रुग्णांच वाढतंय प्रमाण, 'ही' आहेत प्रमुख कारणं

अर्जेंटिनामधल्या ल्युसिआना एम. चेरुबिन यांना पाच वर्षांचा अनुभव असून, त्यांनी पोषण या विषयातली पदवी घेतलेली आहे. त्यांच्या मते, मटकी ऊर्जा वाढवते. कारण त्यात असलेलं व्हिटॅमिन बी हे अन्नाचं इंधनात रूपांतर करण्यासाठी महत्त्वाचं काम करतं. स्नायू कमावण्यासाठी, तसंच दुखावलेले स्नायू बरे करण्यासाठी मटकी उपयुक्त ठरते. कॅल्शिअम आणि फॉस्फरसचा उत्तम स्रोत असल्याने मटकी ऑस्टिओपोरॉसिसला प्रतिबंध करण्यात आणि त्याच्याशी दोन हात करण्यात मदत करते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

एकंदरीतच मटकी सर्वांच्याच नियमितपणे आहारात हवी, खासकरून शाकाहारी व्यक्तींच्या आहारात तर हवीच हवी.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : एवढीशी मटकी, पण फायदे तिचे भारी; आरोग्यासाठी आहे खूपच गुणकारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल