हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव वाटते. कारण या काळात थंड वारे आणि थंड हवामान त्वचेतील ओलावा काढून घेतात. यासाठी कोणतीही महागडी क्रिम विकत घेण्याआधी एक उपाय नक्की करुन पाहा. तो म्हणजे, हिवाळ्यात, त्वचा मुलायम आणि मऊ ठेवण्यासाठी घरी मॉइश्चरायझर बनवता येईल. ज्यासाठी आवश्यक सर्व साहित्य सहज उपलब्ध आहे.
Water Intake : जेवणापूर्वी जास्त पाणी प्यायल्यानं वजन कमी होतं का ? आहार तज्ज्ञ काय सांगतात ?
advertisement
होममेड क्रीमसाठी, त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी 2 चमचे खोबरेल तेल, 1 चमचा मध आणि 1 चमचा तूप आणि 1 चमचा गुलाबजल, 2 ते 3 थेंब व्हिटॅमिन ई आणि 1 चमचा कोरफड गर आवश्यक आहे. हे क्रिम तयार करण्यासाठी एका स्वच्छ भांड्यात खोबरेल तेल, तूप आणि मध घाला. आता या तीन गोष्टी नीट मिसळा. त्यात गुलाब पाणी आणि कोरफडीचा गर मिसळा, शेवट व्हिटॅमिन ई चं तेल घाला आणि चांगलं मिक्स करा. होममेड क्रीम तयार आहे.
Banana Peels : केळ्याचं साल टाकू नका, चेहऱ्यावरचे डाग, वर्तुळांवर आहे स्वस्त, प्रभावी उपाय
हे क्रीम त्वचेवर दिवसातून दोन ते तीन वेळा लावा. आंघोळीनंतर क्रिम जरुर लावा. कारण काहीवेळा, आंघोळीनंतर, चेहरा कोरडा होतो. हे क्रिम लावल्यानं चेहऱ्यावरची सूज आणि खाज कमी होते. हे क्रीम हिवाळ्यात तुमची त्वचा मऊ, आणि निरोगी ठेवण्यास मदत करेल. याशिवाय तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी आणि ई असलेल्या पदार्थांचं प्रमाण जास्त ठेवा. कारण त्वचेला बाहेरुन कितीही क्रिम, तेल लावलं तरी तुमचा आहार कसा आहे यावर तुमच्या त्वचेची गुणवत्ता अवलंबून असते.
