यामुळे केवळ आपलं सौंदर्यच खराब होत नाही, तर थकवा आणि वाढत्या वयाचे संकेतही मिळतात. जर तुम्हीही काळ्या वर्तुळांमुळे त्रस्त असाल, तर काळजी करण्याची गरज नाही. महागड्या क्रीम्स आणि उपचारांऐवजी, काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही यातून सुटका मिळवू शकता. डॉ. दिनेश चंद्र सेमवाल यांनी काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे दिसणार नाहीत.
advertisement
टोमॅटो आणि लिंबाचा रस, बटाट्याचा रस, थंड ग्रीन टी बॅग, गुलाबजल, बदामाचं तेल आणि मध, काकडी-दही पॅक यांसारखे नैसर्गिक उपाय तुमची त्वचा चमकदार आणि ताजीतवानी बनवतील. त्यांचा योग्य वापर कसा करायचा, ते सविस्तरपणे जाणून घेऊया...
टोमॅटो आणि लिंबाचा रस
- एक चमचा टोमॅटोचा रस आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा.
- कापसाच्या बोळ्याने डोळ्यांखाली लावा आणि 10 मिनिटांनंतर धुवा.
- हे आठवड्यातून 3-4 वेळा करा. याचा परिणाम एका महिन्यात दिसू लागेल.
बटाट्याचा रस
- बटाटा किसून त्याचा रस काढा.
- डोळ्यांखाली लावा आणि 15 मिनिटांनंतर धुवा.
- हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतं.
- या गोष्टींचा योग्य वापर केल्यास डोळ्यांखालील काळे डाग पूर्णपणे निघून जातील.
थंड ग्रीन टी बॅग
- वापरलेल्या ग्रीन टी बॅग फ्रीजमध्ये थंड करा आणि 12-15 मिनिटे डोळ्यांवर ठेवा.
- यामुळे काळी वर्तुळे कमी होतीलच, पण थकवा आणि सूज कमी होण्यासही मदत होईल.
गुलाबजलही रामबाण उपाय
- गुलाबजलात कापसाचे बोळे भिजवून डोळ्यांवर ठेवा.
- 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.
- यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि काळी वर्तुळे कमी होतात. महिला अनेकदा हे उपाय घरी करतात.
बदामाचं तेल आणि मध
- 2-3 थेंब बदामाच्या तेलात एक थेंब मध मिसळा.
- डोळ्यांखाली हळूवारपणे लावा आणि रात्रभर ठेवा.
- सकाळी पाण्याने धुवा.
- नियमित वापराने, काही आठवड्यांत काळी वर्तुळे कमी होतील.
काकडी आणि दही पॅक
- आपण अन्नात काकडी आणि दही वापरतो, पण या दोघांचं मिश्रण काळी वर्तुळे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
- एक चमचा काकडीचा रस आणि एक चमचा दही मिसळा.
- हा पॅक डोळ्यांखाली लावा आणि 15 मिनिटांनंतर धुवा.
- यामुळे त्वचा हायड्रेट आणि थंड होते.
या सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून आराम मिळवू शकता.
हे ही वाचा : तुम्हीही नैराश्यात आहात? मनात नको ते विचार येतात? तर रोज आवर्जुन करा 'हे' काम, शांत राहील मन!
हे ही वाचा : उन्हाळ्यात दही खावे की लस्सी प्यावी? कोणता पदार्थ पोट हलकं ठेवेल अन् आरोग्यही राहील तंदुरुस्त?
