TRENDING:

हिवाळ्यात खोकल्यामुळे होतोय छातीमध्ये त्रास तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम

Last Updated:

आयुर्वेदिक डॉक्टर शालिनी जुगरान यांनी याबाबत माहिती दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिना आजमी, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

डेहराडून, 21 डिसेंबर : हिवाळा सुरू झाला असून भारतातील विविध भागात थंडीची लाट वाढत आहे. हवामानातील बदल आणि कोरड्या थंडीमुळे सर्दी, विषाणूजन्य आजार होत आहेत. या थंडीच्या दिवसात बहुतेक लोकांना खोकल्याचा त्रास होतो. न्यूमोनिया किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हा कफ तुमची छाती घट्ट करतो आणि यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. खूप खोकला येतो. लहान मुलांना हा त्रास जास्त होत असल्याचे दिसते. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन आराम मिळवू शकतात.

advertisement

उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथील रहिवासी आयुर्वेदिक डॉक्टर शालिनी जुगरान यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हिवाळ्यात जेव्हा तुम्हाला सर्दी होते, तेव्हा तुम्हाला आधी नाक आणि घशात जळजळ जाणवते. यासाठी सर्वप्रथम थंड पाण्याचा वापर टाळावा. फक्त कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जर एखाद्याला असे वाटत असेल की त्याला सर्दी होत आहे, तर त्याने कोमट पाण्यात थोडे मीठ घालावे आणि घसा गरम करू शकतो आणि गुळण्या करू शकतो. याशिवाय झोपण्यापूर्वी नाकावर विक्स लावा. यामुळे तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी कमी होते.

advertisement

डॉ. शालिनी जुगरान या पुढे म्हणाल्या की, काही घरगुती उपायांनीसुद्धा सर्दी-खोकल्यापासून आराम मिळू शकतो. आले ठेचून त्याचा रस काढावा आणि नंतर 15 ते 20 तुळशीची पाने घेऊन या दोन्ही रसांचे मिश्रण करावे आणि ते दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करावे. असे केल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. यासोबतच आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे आवळ्याचा रस तुळशीच्या पानांच्या रसासोबत घेऊ शकतात. तसेच काळी मिरी पावडर मधासोबत घेतल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. आल्याचा रस आणि तुळशीच्या पानांचा रस एक-दोन थेंब लहान मुलांना दिल्यासही खोकल्यापासून आराम मिळतो, असेही त्यांनी सांगितले.

advertisement

डॉ. जुगरान पुढे म्हणाल्या की, हळदीमध्ये असे गुणधर्म आहेत, जे कोणत्याही प्रकारचे संक्रमण वाढण्यापासून थांबवतात. तुम्ही त्यात थोडी हळद घालून दूध पिऊ शकता. मध आणि आल्याचा गरम चहा प्या. यामुळे तुमच्या घशाला आराम मिळेल. तसेच आपल्या नाकाच्या आत असलेल्या पेशींमध्ये शत्रूचे विषाणू ओळखण्यासाठी सेन्सर असतात. या सेन्सर्सला माहिती मिळाल्यावर ते आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना सिग्नल पाठवतात. हे सिग्नल सायटोकिन्स आणि रसायनांच्या स्वरूपात पाठवले जातात. हा सिग्नल मिळताच, शरीराच्या संरक्षणात्मक पेशी संक्रमित भागात त्यांची क्रिया सुरू करतात. ते वाढल्यानंतर व्यक्तीला नाक आणि घशात अस्वस्थता जाणवते. यावेळी विषाणूजन्य आजारांसोबत सुरू असलेल्या लढाईमुळे तुम्हाला थकवा जाणवतो. यावेळी विश्रांती घेतल्यास बरे होईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

advertisement

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती तज्ञांशी झालेल्या चर्चेवर आधारित आहे. ही सामान्य माहिती असून हा वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात. कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरा. लोकल18 टीम या वापरामुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही, कृपया हे लक्षात घ्यावे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात खोकल्यामुळे होतोय छातीमध्ये त्रास तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल