मोबाईलच्या अतिवापरामुळे अँड्रॉईड मेनिया आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. लॉकडाऊन पूर्वी मानसोपचार तज्ज्ञांकडे महिन्याला येणाऱ्या 100 रुग्णापैकी 15 रुग्ण अँड्रॉईड मेनिया आजाराची लक्षणे असलेली होती. आता हे प्रमाण 30 ते 35 वर आले आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरशहरामधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी दिली आहे.
बसल्या बसल्या कमी होईल कोलेस्टेरॉल आणि वजन! फक्त सकाळ-संध्याकाळ करा हे काम
advertisement
सध्या स्वस्तात आणि सहज उपलब्ध झालेले तंत्रज्ञान गरजेपेक्षा सवय बनलंय. त्यात तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुःखही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा ट्रेंड सध्या चालू आहे. ऑनलाइन गेमिंग तरुण वर्ग सध्या मोठ्या प्रमाणात खेळत आहे. त्यामुळे या जीवनशैलीचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतोय.
आत्मीयता, संवेदनशीलता आणि एकमेकांवरील विश्वासाचे नाते हरवल्याने स्वसंवादासह कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी प्रत्यक्ष तरुणाई हरून बसल्याने अँड्रॉइड मेनिया संख्या वाढत आहे.त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होत यावर नियंत्रणासाठी प्रयत्न करावा आणि प्रत्यक्ष संवादावरती भर द्यावा, असं डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले.
भिजवलेले अक्रोड खाण्याचे हे फायदे माहितीये? शरीराच्या या 5 समस्यांपासून मिळतो आराम
काय आहे उपाय?
मोबाईलसाठी एक ठराविक वेळ हा तरुणांनी द्यायला पाहिजे. त्याचबरोबर एकमेकांमधील संवाद वाढावा विशेषतः रात्री जास्त मोबाईलचा वापर करू नये. यामुळे आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, असंही डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले.