या महिलांच्या आहारात फायबर, प्रोटीन असणारे घटक तसंच पालेभाज्या यांचा समावेश हवा. मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावं तसंच मनुके चघळून खावेत. त्यामुळे इम्युनिटी वाढते. एक गाजर, आवळा आणि बीट रस हे पदार्थ तुम्ही सकाळी नाष्टानंतर सूप म्हणून पिऊ शकता. त्याचबरोबर एक टोमॅटो सालीसह खावे. त्याचे सूपही तुम्ही पिऊ शकता. त्याचबरोबर कोथिंबिरचा सूपही इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे, असं कर्णिक यांनी सांगितलं.
advertisement
Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीयेत? कारण जाणून घ्या आणि जीवनशैलीत करा बदल, होईल फायदा
दररोज तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. कॅल्शियम असणाऱ्या घटकांचे प्रमाण आहारामध्ये जास्त असावे. त्यासाठी तुम्ही रोज दूध पिऊ शकता. या दुधामध्ये एक चमचा खारीक पावडर टाकली तर हाडांचा त्रास कमी होतो,असंही त्यांनी सांगितलं.
तुम्हाला थकवा जाणत असेल तर दोन खजूर हे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी पाण्यासकट ते खजूर खावे.
Health tips : सकाळी उठल्यावर फक्त 'ही' पेयं प्या, वजन तर कमी होईल पण...
त्याचबरोबर आहारामध्ये जास्तीत जास्त कडधान्य आणि नाचणीचा समावेश हवा. त्याचबरोबर रोज फळ आवर्जुन खावे किंवा फळाचा रस घ्यावा. हा आहार चाळीसीनंतर महिलांनी ठेवला तर त्याचा फायदा होईल, असे कर्णिक यांनी स्पष्ट केला.
(टीप : या बातमीतील मत ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)