Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीयेत? कारण जाणून घ्या आणि जीवनशैलीत करा बदल, होईल फायदा

Last Updated:

पिंपल्सचे कारण हार्मोन्समधील असंतुलन आहे. किशोरवयीन तरुणांमध्ये मुरुमांचे प्रमाण अधिक प्रमाण दिसून येते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील बदल.

News18
News18
मुंबई, 22 सप्टेंबर : चेहऱ्यावर पिंपल्स किंवा पुरळ ही एक सामान्य समस्या आहे. विशेषत: तरूण वर्ग त्यामुळे त्रस्त आहे. त्यांच्यावर विविध प्रकारची उत्पादने लावली जातात. अनेक वेळा ही सर्व उत्पादने चेहऱ्यावर लावल्यानंतर त्वचेला कोणताही फायदा होण्याऐवजी ते आणखी नुकसान करतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मुरुमांचे कारण जाणून न घेता उपचार करणे. होय चेहऱ्यावर पिंपल्स येण्यामागील कारण जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर योग्य उपचार करता येतील. त्वचारोग तज्ज्ञ आणि हेअर केअर तज्ज्ञ डॉ. रेखा गुप्ता यांच्या मते, मुरुमांचे कारण चेहऱ्याच्या ज्या भागातून दिसते त्या भागावरून ठरवता येते.
हार्मोनल बदलांमुळे येतात चेहऱ्यावर पिंपल्स
मुरुमांचे कारण हार्मोन्समधील असंतुलन आहे. किशोरवयीन तरुणांमध्ये मुरुमांचे प्रमाण अधिक दिसून येते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील बदल. तारुण्यात यौवन सुरू झाल्यावर त्याच्या शरीरात अनेक बदल घडून येतात. ज्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. या प्रकारचा पुरळ जरी कालांतराने निघून जातो, पण तो खूप वाढला तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्यावर उपचार करता येतात.
advertisement
झोप न लागणे आणि जंक फूडचे सेवन हीदेखील कारणे
कपाळावर पुरळ येण्याचे कारण म्हणजे तणाव किंवा झोप न लागणे. जेव्हा-जेव्हा गालावर पिंपल्स दिसतात तेव्हा खाण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक असते. जर तुम्ही खूप गोड किंवा शुद्ध साखर असलेले अन्न खात असाल तर ते ताबडतोब बंद करणे आवश्यक आहे. जेणेकरून गालावरील मुरुमांची समस्या दूर करता येईल. दुसरीकडे नाक आणि भुवयांच्या दरम्यानच्या भागात जास्त मुरुम दिसू लागल्यास फास्ट फूड आणि तळलेले अन्न हे कारण आहे.
advertisement
दिनचर्या बदलल्यास होईल फायदा..
मुरुमांच्‍या समस्येपासून सुटका मिळवण्‍यासाठी जीवनशैलीत छोटे-मोठे बदल करण्‍याची आवश्‍यकता आहे. नियमितपणे उशा स्वच्छ करणे, मोबाईल फोनची स्क्रीन आठवड्यातून दोनदा स्वच्छ करणे आणि वेळोवेळी चांगल्या शॅम्पूने केस धुणे. लक्षात ठेवा मुरुमांची समस्या केवळ क्रीम लावून सुटणार नाही, तर संपूर्ण दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीयेत? कारण जाणून घ्या आणि जीवनशैलीत करा बदल, होईल फायदा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement