advertisement

Vaibhav Sooryavanshi : धमाका केला पण उपयोग नाही, वैभव सूर्यवंशी टीम इंडियाकडून का खेळू शकणार नाही?

Last Updated:
अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 100 रननी पराभव केला आणि सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली. वैभव सूर्यवंशी टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला.
1/7
वैभव सूर्यवंशीने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 80 बॉलमध्ये 175 रनची वादळी खेळी केली. 218.75 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना वैभवने 15 सिक्स आणि 15 फोर मारले. वैभवला या कामगिरीबद्दल प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं.

2/7
फक्त 14 वर्षांच्या असलेल्या वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या 19 वर्षांच्या खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूलाही लाजवेल असं आक्रमण केलं. या खेळीनंतर वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार झाल्याचं अनेकांना वाटत आहे.

3/7
वैभव सूर्यवंशीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन करायला तयार आहोत, हे दाखवून दिलं, पण तरीही त्याची भारताच्या सीनियर टीममध्ये निवड होणार नाही. याला कारण आहे आयसीसीने 2020 साली बनवलेला एक नियम.

4/7
तरुण खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी 2020 मध्ये किमान वय धोरण आणलं. या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाटी खेळाडूचं किमान वय 15 वर्ष असणं गरजेचं आहे.

5/7
27 मार्च रोजी जन्मलेला वैभव सूर्यवंशी वर्ल्ड कपच्या विजयावेळी 14 वर्षांचा होता. एक खेळाडू फक्त एकदाच अंडर-19 वर्ल्ड कप खेळू शकतो, असा नियम बीसीसीआयने केला आहे. नव्या आणि जास्त खेळाडूंना संधी मिळावी म्हणून बीसीसीआयने हा नियम बनवला आहे.

6/7
सध्या 14 वर्षांचा असलेला वैभव 2028 आणि 2030 च्या अंडर-19 वर्ल्ड कपसाठीही त्याच्या वयामुळे पात्र असेल, पण बीसीसीआय नियमामध्ये बदल करून वैभवला पुन्हा अंडर-19 वर्ल्ड कप खेळायला परवानगी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

7/7
वैभव सूर्यवंशी हा 2026 मध्ये 15 वर्षांचा होताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र होईल, त्यामुळे त्याची टीम इंडियामध्ये होणारी निवड ही फक्त औपचारिकता असेल, असं मत दिग्गज क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे.

पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement