advertisement

‘दादा…’ म्हणत ढसाढसा रडला माजी आमदार, अस्थी विसर्जनावेळी थेट मारली नदीत उडी; उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला

Last Updated:

अजित पवारांच्या आमदाराला भावना अनावर झाल्याने त्या त्यांनी थेट कुकडी नदीत उडी मारली, क्षणातच परिसरात एकच शांतता पसरली.

News18
News18
सचिन तोडकर, प्रतिनिधी
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झालं. मात्र दादांच्या अकाली जाण्यानं अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही, याचीच प्रचिती आज पुण्यात आली.  अजित पवार यांच्या अस्थींचे राज्यभरात विविध ठिकाणी श्रद्धेने विसर्जन केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कुकडी नदीमध्ये पार पडला यावेळी माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. मात्र विधी पूर्ण होताच अतुल बेनके यांना भावना
advertisement
राज्याच्या राजकारणात धडाडीने काम करणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी सतत झटणारे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आपलेसे करणारे नेतृत्व हरपल्याची जाणीव या प्रसंगी अधिक तीव्रतेने जाणवली. अजित पवार यांच्याशी अतुल बेनके यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्यावरील अपार प्रेम आणि आदर या एका कृतीतून प्रकर्षाने व्यक्त झाला. कुकडी नदीच्या प्रवाहात अस्थी विसर्जित झाल्यानंतर उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते भावनाविवश झाले होते. ‘दादा’ या एकाच हाकेत ज्यांनी हजारो कार्यकर्त्यांना उभे केले, ते आज प्रत्यक्षात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही.
advertisement

सगळ्यांचे डोळे पाणवले 

अस्थी विसर्जनावेळी जड अंतकरणाने उपस्थितांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला. अजित पवारांच्या निधाने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या लाडक्या नेत्याचे अस्थी विसर्जन होताना हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. या भावूक क्षणाला सगळे गहिवरून गेले, सगळ्यांचे डोळे पाणवले होते.

दादांची अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्राला चटका लावणारी

advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या निधानाने महाराष्ट्राने एक कर्तृत्वान आणि तळागाळाशी जोडलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. 29 जानेवारी रोजी बारामतीमध्ये लाखो समर्थकांबरोबरच अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यात आला अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. वेगवान कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांना विमानाच्या वेगवान प्रवासानंच बळी घेतला. अपघात झालेलं हे 'लिअरजेट 45' विमान प्रामुख्यानं अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी बनवण्यात आलं. हे त्याच्या वर्गातील सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे. हे विमान ताशी सुमारे 860 किमी वेगाने उडू शकतं. मुंबई ते बारामती हे अंतर हे विमान अवघ्या 20 ते 25 मिनिटांत कापतं.. पण, वेगवान अजित पवारांच्या या वेगवान विमानानं बळी घेतला. वेळेचे पक्के असलेल्या अजित पवारांचा या अपघातानं वेळ चुकवला. दादांची ही अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्राला चटका लावून गेली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
‘दादा…’ म्हणत ढसाढसा रडला माजी आमदार, अस्थी विसर्जनावेळी थेट मारली नदीत उडी; उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement