advertisement

Maharashtra Kesari : कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली महाराष्ट्र केसरी, वेदीका ससाणेला आस्मान दाखवलं, VIDEO

Last Updated:

चौथ्या महिला महाराष्ट्रात केसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनल सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारीने बाजी मारली आहे. तिने कोल्हापूर शहरच्या वेदीका ससाणेचा 7-0 असा पराभव करत महाराष्ट्र केसरी ठरली आहे.

Vedika Sasane vs Amruta Pujari Final
Vedika Sasane vs Amruta Pujari Final
Maharashtra Kesari 2026, Vedika Sasane vs Amruta Pujari Final : निर्झरा केअर फाऊंडेशनच्या वतीने सोलापुरातील हरीभाई प्रशाला मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्रात केसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनल सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारीने बाजी मारली आहे. तिने कोल्हापूर शहरच्या वेदीका ससाणेचा 7-0 असा पराभव करत महाराष्ट्र केसरी ठरली आहे. त्यामुळे आता चांदीची गदा आणि बक्षीस स्वरूपात किया सोनेट ही कार बक्षीस स्वरूपात मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासणे यांच्यात झाली. सुरुवातीपासून अमृता हिने आक्रमक चाल खेळत वेदिकाला कब्जात ठेवले. पहिल्या दीड मिनिटात दोन गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा तीन गुण मिळवून पहिल्या सत्रात पाच शून्य अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात वेदिकाने आक्रमक चाल खेळली परंतु अमृताने संयम दाखवत पुन्हा दोन गुण घेतले आणि विजय पक्का केला. शेवटचे दोन मिनिटे अमृताने डिफेन्स करत वेदिकाला थोपवून ठेवले. ७-० अशा फरकाने अमृताने वेदिकाचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विजेत्या अमृता पुजारी हिला चांदीची गदा , रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सोनेट कारची चावी प्रदान करण्यात आली. तर उपविजेत्या वेदिका सासनेला २५ हजार रुपये रोख ,स्मृतिचिन्ह आणि बुलेट बक्षीस देण्यात आली .
advertisement
दरम्यान अमृता पुजारी हिने वेदिका सासने हिच्यावर मात केल्यानंतर समर्थक महिला कुस्तीपटू यांनी अमृता पुजारी आणि प्रशिक्षक दादासो लवटे यांना खांद्यावर घेऊन कुस्तीच्या मैदानामधून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली महाराष्ट्र केसरी, वेदीका ससाणेला आस्मान दाखवलं, VIDEO
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement