advertisement

IPL 2026 : 'टेन्शन घेऊ नको, हे वानखेडे आहे...', रघुवंशीसाठी ब्रेक ठरला टर्निंग पॉईंट, अज्जूभाईने मॅच फिरवली!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात केकेआरने पहिले बॅटिंग करून मोठा स्कोअर केला. वानखेडे स्टेडियमवर केकेआरच्या दोन मुंबईकरांनीच पहिल्या इनिंगमध्ये धमाका केला.

'टेन्शन घेऊ नको, हे वानखेडे आहे...', रघुवंशीसाठी ब्रेक ठरला टर्निंग पॉईंट, अज्जूभाईने मॅच फिरवली!
'टेन्शन घेऊ नको, हे वानखेडे आहे...', रघुवंशीसाठी ब्रेक ठरला टर्निंग पॉईंट, अज्जूभाईने मॅच फिरवली!
मुंबई : आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात केकेआरने पहिले बॅटिंग करून मोठा स्कोअर केला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 220 रनपर्यंत मजल मारली. केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी अर्धशतकं केली. अजिंक्य रहाणेने 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 67 रन केले तर अंगक्रिश रघुवंशी याने 29 बॉलमध्ये 51 रनची आक्रमक खेळी केली. रघुवंशीने या इनिंगमध्ये 2 सिक्स आणि 6 फोर लगावल्या.
रहाणे आणि रघुवंशीशिवाय केकेआरचा ओपनर फिन ऍलनने 17 बॉल 37 आणि रिंकू सिंगने 21 बॉलमध्ये नाबाद 33 रन केले. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने 3 आणि हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली.

मुंबईकरांचा धमाका

अंगक्रिश रघुवंशी आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईकर आहेत. अंगक्रिश आणि रहाणे दोघंही मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळतात, त्यामुळे त्यांना वानखेडे स्टेडियमचा कोपरा न कोपरा माहिती आहे, याचाच फायदा त्यांना या सामन्यात झाला.
advertisement

काय म्हणाला अंगक्रिश रघुवंशी?

इनिंग संपल्यानंतर अंगक्रिश रघुवंशीने खेळपट्टी बॅटिंगला चांगली असल्याची प्रतिक्रिया दिली. 'पिच बॅटिंगसाठी चांगलं आहे, पण स्लो बॉल बॉलरना मदत करत आहे. आम्ही चांगली बॉलिंग केली तर मॅच जिंकू. मी सुरूवातीला संघर्ष करत होतो, पण सुदैवाने टाईम आऊट झाला. अभिषेक सर आणि अज्जू भैय्यांनी मला खंबीर राहायला सांगितलं. बॉलवर लक्ष ठेव जास्त दडपण घेऊ नकोस. वानखेडेवर रन येतच राहतील, असं ते मला सतत सांगत होते. याचा मला फायदा झाला', असं अंगक्रिश रघुवंशी म्हणाला.
advertisement
'बुमराहच्या बॉलिंगवर मारलेला स्वीप शॉट मला आवडला. या खेळपट्टीवर स्पिन बॉलिंगसाठी फार काहीही नाही, पण आमचे स्पिन बॉलर काचेच्या खेळपट्टीवरही बॉलिंग करू शकतात', असं वक्तव्य अंगक्रिश रघुवंशीने केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'टेन्शन घेऊ नको, हे वानखेडे आहे...', रघुवंशीसाठी ब्रेक ठरला टर्निंग पॉईंट, अज्जूभाईने मॅच फिरवली!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement