Binlagnachi Goshta: लग्नाआधीच आई- बाबा होणाऱ्या कपलची ‘बिन लग्नाची गोष्ट’, प्रिया- उमेशचा चित्रपट ओटीटीवर होतोय ट्रेंड; कुठे पाहाल?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
प्रिया आणि उमेश यांचा ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होताच ट्रेंडिंगवर आलेला आहे.
मुंबई: प्रिया बापट आणि उमेश कामत हे कपल मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांचं आवडतं कपल आहे. मालिका, चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून या कपलने अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र केले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रिया आणि उमेश यांचा ‘बिन लग्नाची गोष्ट’ नावाचा चित्रपट कमालीचा चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. प्राईम व्हिडिओ या ओटीटीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. रिलीज होताच हा चित्रपट ट्रेंडिगवर आला आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे.
नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ज्या प्रेक्षकांनी प्रिया- उमेशचा ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपट पाहिला नाही, अशांना आता ओटीटीवर पाहाण्याची संधी आहे. बदलत्या जीवनशैली प्रमाणे नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा बदलताना दिसत आहे. त्याचप्रमाणे पाहणाऱ्या या चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद ओटीटीवर मिळत आहे. रिअल लाईफ कपलची ऑनस्क्रिन लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे.
advertisement
आयुष्यातल्या गोड- तिखट प्रसंगांनी प्रेक्षकांना भावनिक केले आहे. हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झाला असून तुम्ही येत्या विकेंडला हा चित्रपट पाहण्याचा बेत घर बसल्या आखू शकणार आहे. रिलेशनवर आधारित असलेल्या चित्रपटात प्रिया बापट आणि उमेश कामत सोबत मुख्य भूमिकेत गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने सुद्धा आहेत. सर्वच कलाकारांच्या दमदार अभिनयाने चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांची आहे. तर दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 5:36 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Binlagnachi Goshta: लग्नाआधीच आई- बाबा होणाऱ्या कपलची ‘बिन लग्नाची गोष्ट’, प्रिया- उमेशचा चित्रपट ओटीटीवर होतोय ट्रेंड; कुठे पाहाल?







