जॉबसोबत स्ट्रॉंग मॅन झाला साहिल, पावर लिफ्टिंगमध्ये केली कमाल, पटकावले 2 गोल्ड मेडल
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आंतरराष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 16 देशांतील खेळाडूंना पराभूत करून दोन गोल्ड मेडल पटकावले आहेत.
सोलापूर : नोकरी करत स्वप्न पूर्ण करता येतात, हे 26 वर्षीय साहिल चावरियाने सिद्ध करून दाखवले. नोकरी सांभाळत क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय यश मिळवता येते, हे सोलापूर शहरातील ओम गर्जना चौकात राहणाऱ्या 26 वर्षीय साहिल सुनील चावरिया यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. सोलापूरमधील एका विमा हॉस्पिटलमध्ये मेल नर्स म्हणून कार्यरत असलेल्या साहिलने नुकत्याच वेतनाम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 16 देशांतील खेळाडूंना पराभूत करून दोन गोल्ड मेडल पटकावले आहेत.
साहिल चावरिया यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूरमध्येच झाले. त्यांची आई सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असून आईकडूनच सेवा आणि शिस्तीचे संस्कार साहिलला मिळाले. नर्सिंगची नोकरी करत असतानाच साहिलला बॉडी बिल्डिंगची आवड होती. याच आवडीपोटी त्यांनी शहरातील एका जिममध्ये नियमित प्रशिक्षण सुरू केले. प्रशिक्षणादरम्यान पावर लिफ्टिंगकडे त्यांचा कल वाढत गेला आणि त्यांनी या खेळात व्यावसायिकरित्या सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
गेल्या तीन वर्षांत साहिलने नोकरीसह कठोर सराव करत पावर लिफ्टिंगमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्र, गोवा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊन 4 स्ट्रॉंग मॅन ट्रॉफी आणि 13 गोल्ड मेडल जिंकले आहेत. काही दिवसांपूर्वी वेतनाम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत साहिलने पुन्हा एकदा देशाचे आणि सोलापूरचे नाव उज्ज्वल केले. या यशाबद्दल लोकल 18 शी बोलताना साहिल म्हणाले की, मेहनत, शिस्त आणि सातत्य असेल तर नोकरी करतानाही मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात. साहिलच्या या यशामुळे सोलापूरकरांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 5:26 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
जॉबसोबत स्ट्रॉंग मॅन झाला साहिल, पावर लिफ्टिंगमध्ये केली कमाल, पटकावले 2 गोल्ड मेडल







