advertisement

नोकरी शोधताय? ही संधी सोडू नका, विविध पदासाठी इथं होणार भरती

Last Updated:

तरुणांसाठी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे.

+
‎छत्रपती

‎छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य रोजगार मेळावा; विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तरुणांसाठी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि लाइटहाऊस कम्युनिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार असून, धर्मवीर संभाजी शाळेजवळील कम्युनिटी सेंटर, N-5 सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये बॅक ऑफिस, डेटा एंट्री, टेलिकॉलिंग, एचआर, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, आयटीआय अप्रेंटिसशिप, आयटी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) तसेच BFSI अशा विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
advertisement
SSC, HSC, डिप्लोमा, ITI, इंजिनिअरिंग, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी QR कोड स्कॅन करून आधी नोंदणी करणे आवश्यक असून, मुलाखतीसाठी फॉर्मल ड्रेसकोडमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
advertisement
‎या उपक्रमातून शहरातील तरुणांना थेट रोजगाराच्या संधी मिळाव्यात, हा उद्देश असून अधिक माहितीसाठी 9764854749, 9604286186, 9356105652 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
नोकरी शोधताय? ही संधी सोडू नका, विविध पदासाठी इथं होणार भरती
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement