advertisement

कोल्हापुरात भीषण अपघात, चार चाकीने ३ दुचाकींना उडवलं, दोन जण जागीच ठार

Last Updated:

कोल्हापूर शहरातील शाहूमिल चौक ते उद्यमनगर रोडवर भरधाव चार चाकी वाहनाने तीन दुचाकींना उडवले. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर अपघात
कोल्हापूर अपघात
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरात भीषण अपघात झाला आहे. एका चारचाकी गाडीने तीन दुचाकींना उडवले असून त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर गंभीर जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरातील शाहूमिल चौक ते उद्यमनगर रोडवर भरधाव चार चाकी वाहनाने तीन दुचाकींना उडवले. अपघाताची तीव्रता एवढी होती की यात कारही उलटली. घटनेत दोन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजारामपुरी पोलिसांसह वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रथमत: अपघातामधील वाहने रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. काही वेळात पंचनामा होऊन गुन्हा नोंद करू, असे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या सगळ्या लोकांना बाजूला हटवून अपघातातील जखमींना मदत करण्याचे काम स्थानिकांनी केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापुरात भीषण अपघात, चार चाकीने ३ दुचाकींना उडवलं, दोन जण जागीच ठार
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement