advertisement

Beauty Secret : महागडे सीरम्स नाही, किचनमधील 'हे' घटक आहेत आदिती राव हैदरीच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य!

Last Updated:

Aditi Rao Hydari Beauty Secret : 'हीरामंडी' फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने तिचं सौंदर्याचं गुपित अगदी साधं असल्याचं सांगितलं आहे. तिच्या मते, सौंदर्याची सुरुवात ड्रेसिंग टेबलवर नाही, तर आपल्या स्वयंपाकघरातून होत असते.

नैसर्गिक ग्लोसाठी कोणते पदार्थ फायदेशीर?
नैसर्गिक ग्लोसाठी कोणते पदार्थ फायदेशीर?
मुंबई : आदिती राव हैदरीच्या त्वचेवर दिसणारा नैसर्गिक ग्लो आणि जुन्या काळाची आठवण करून देणारं तेज नेमकं कुठून येतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. क्लोज-अप शॉट्समध्येही सहज सुंदर दिसणाऱ्या या ग्लोमागे महागडे सीरम्स किंवा सेलिब्रिटी डर्मेटोलॉजिस्ट असतील, असं अनेकांना वाटतं. मात्र 'हीरामंडी' फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने तिचं सौंदर्याचं गुपित अगदी साधं असल्याचं सांगितलं आहे. तिच्या मते, सौंदर्याची सुरुवात ड्रेसिंग टेबलवर नाही, तर आपल्या स्वयंपाकघरातून होत असते.
तेजस्वी त्वचा, देखणी स्टाईल, चमकदार केस आणि तिची खास 'रॉय' अदा यासाठी अदिती ओळखली जाते. मात्र तिच्या स्किनकेअर रुटीनबाबत विचारलं असता 'माझं स्वयंपाकघरच माझं ब्यूटी शेल्फ आहे.' असं ती सांगते. अलीकडेच एएनआयशी बोलताना अदितीने सौंदर्याकडे पाहण्याची ही पद्धत तिला तिच्या आईकडून मिळाली आणि ती रोजच्या आहाराशी जोडलेली आहे, असे सांगितले.
advertisement
अदिती सांगते की, स्किनकेअर हा शरीराच्या पोषणाचाच एक भाग आहे. शरीरात जे जातं आणि त्वचेवर जे लावलं जातं, ते दोन्ही एकाच स्रोतापासून येतं. ट्रेंड्स किंवा व्हायरल रुटीनच्या मागे धावण्यापेक्षा शरीर आणि त्वचा नैसर्गिकरित्या कशाला प्रतिसाद देतात, हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे, असं अदितीचं मत आहे.
आदिती म्हणाली, 'मी माझं स्वयंपाकघर थेट माझ्या चेहऱ्यावर वापरते. हे मला माझ्या आईने शिकवलंय. स्वयंपाकघरातील अनेक वस्तू मी चेहऱ्यावर लावते. मी जे खाते, त्यातील बरंचसं माझ्या त्वचेसाठीही वापरते', असं अदितीने एनआयला सांगितलं.
advertisement
नैसर्गिक ग्लोसाठी कोणते पदार्थ फायदेशीर?
मध : त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवणारा नैसर्गिक घटक आहे. मध त्वचेला मऊपणा देतो.
हळद : सौम्य फेसपॅकमध्ये हळद मिसळल्यास त्वचा शांत आणि उजळ दिसण्यास मदत करते.
दही : नैसर्गिक लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे थकलेली त्वचा ताजीतवानी करण्यासाठी दही उपयुक्त असते.
कोरफड जेल : कोरफड जेल हे त्वचेला शांतता, ओलावा आणि नैसर्गिक चमक देण्यासाठी प्रभावी.
advertisement
नारळाचं तेल : कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त असलेलं साधं आणि प्रभावी मॉइश्चरायझर आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)



advertisement
तेजस्वी त्वचेसाठी ट्रेंड्स किंवा झटपट उपायांच्या मागे धावण्याची गरज नाही. त्वचेला वेळ देणं, तिचं ऐकणं आणि तिला खरंच जे हवं आहे ते देणं हेच महत्त्वाचं असतं. कधी कधी थोडा संयम आणि योग्य घटक पुरेसे ठरतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Beauty Secret : महागडे सीरम्स नाही, किचनमधील 'हे' घटक आहेत आदिती राव हैदरीच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य!
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement