आज आपण पाहणारा आहोत, उपवासाचा पराठा. इंस्टाग्रामवर maileki_kitchen या अकाऊंटवरून महिलेने या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे. हा पराठा बनवायला एकदम सोपा आहे. चला पाहूया, उपवासाच्या पराठ्याची रेसिपी.
उपवासाचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- उकडलेले बटाटे
- राजगिऱ्याचे पीठ
- मीठ
- तेल
- हिरव्या मिरच्या
- जिरे
उपवासाचा पराठा बनवण्याची कृती
advertisement
- उपवासाचा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचाय. हा बटाटा किसून घ्या.
- या पराठ्यासाठी आपल्याला ठेचादेखील लागेल. यासाठी हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ टाकून तेच वाटून घ्या.
- हा ठेचा उकडलेल्या बटाट्यांमध्ये टाका. यामध्ये राजगिऱ्याच्या पीठ घाला आणि चवीनुसार मीठ घालून कणिक मळून घ्या.
- कणिक मळताना गरज असल्यास थोडे थोडे पाणी घाला आणि व्यवस्थित कणिक मळून घ्या.
- आता या कणकेतून एक छोटा गोळा घ्या आणि कोरड्या पिठात बुडवून त्याचा परत लाटून घ्या.
- आता हा पराठा तव्यावर टाकून, दिनही बाजूंनी तूप लावून मस्तपैकी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्या.
पाहिलंत, हा पराठा बनवायला अगदी सोपा आहे आणि अगदी झटपट तयार होतो. चवीला तर उत्तम लागतो. तर या महाशिवरात्रीला साबुदाणा खिचडी व्यतिरिक्त या खास पदार्थही नक्की बनवून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
