TRENDING:

APMC Market: केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?

Last Updated:

गुरुवार, दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गुरुवार, दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, केळी आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
advertisement

आल्याच्या आवकेत सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2710 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 1014 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3610 ते 6343 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 26 क्विंटल आल्यास 5600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Weather Alert : महाराष्ट्रात आता वारं फिरलं, थंडी गायब आता.., हवामान विभागाडून अलर्ट

advertisement

केळीचे दर खाली

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 699 क्विंटल केळीची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात सर्वाधिक 289 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 1300 ते 1750 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक बाजारात आवक झालेल्या 260 क्विंटल केळीस सर्वाधिक 1600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

डाळिंबाची आवक कमी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 1120 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 660 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 15000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 12 क्विंटल डाळिंबास सर्वाधिक 12000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल