advertisement

Success Story : पारंपरिक पिकांना फाटा, तरुणाने केली फळाची शेती, कमाईही दमदार Video

Last Updated:

आधुनिक पद्धतीने खरबूज लागवड केली असून खर्च वजा करून दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा मिळणार आहे.

+
News18

News18

सोलापूर : आजच्या काळात उच्च शिक्षण घेऊनही अनेक तरुण नोकरीसाठी शहराकडे धाव घेत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील एका जिद्दी तरुण शेतकऱ्याने वेगळी वाट निवडली आहे. सागर शेंबडे बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने पारंपरिक पिकांना फाटा देत, आधुनिक पद्धतीने खरबूज लागवड केली असून खर्च वजा करून दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा मिळणार असल्याची माहिती सागर शेंबडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावात राहणाऱ्या सागर शेंबडे या तरुणाचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने सागरने बारावीपर्यंत शिक्षण घेऊन शेती करायचा निर्णय घेतला. गेल्या 10 वर्षांपासून सागर शेती करत आहे. यंदाच्या वर्षी सागरने एका एकरात खरबुजाची लागवड केली आहे. खरबूज लागवडीपूर्वी सागरने शेतीची मशागत करून खरबुजाची लागवड केली. खरबुजावर करपा, भुरी हा रोग पडू नये म्हणून वेळोवेळी फवारणी करून घेतली. एका एकरात खरबूज लागवडीसाठी सागरला 60 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर खर्च वजा करून दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा मिळणार असल्याची माहिती सागर शेंबडे यांनी दिली.
advertisement
सध्या सागर कोन्हेरी गावातून खरबुजाची विक्री सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत करत आहे. तसेच आठवड्यातून एकदा पुणे किंवा मुंबईच्या मार्केटमध्ये खरबुजाची विक्री करत आहे. तर बाजारामध्ये खरबुजाला सध्या 15 ते 20 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. तरुणांनी केवळ उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या मागे न धावता, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीकडे वळावे. योग्य नियोजन केल्यास नोकरी करणाऱ्या व्यक्तीलाही लाजवेल इतके उत्पन्न शेतीतून नक्कीच मिळू शकते, असा मोलाचा सल्ला सागर शेंबडे यांनी दिला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : पारंपरिक पिकांना फाटा, तरुणाने केली फळाची शेती, कमाईही दमदार Video
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement