'...म्हणून शिक्षा भोगावी लागतेय', राजपाल यादवची तिहार जेलमधून सुटका नाहीच! 9 कोटींच्या कर्ज प्रकरणी हायकोर्टाचा फटका
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rajpal Yadav Controversy: ९ कोटींच्या जुन्या कर्ज प्रकरणात अडकलेल्या राजपाल यांना दिल्ली हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट, कोर्टाने राजपाल यांच्या आजवरच्या वागणुकीवर ताशेरे ओढले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
कोर्टाने म्हटलं की, तुम्ही वर्षानुवर्षे पैशांची परतफेड टाळली, अनेकदा सेटलमेंटची आश्वासनं देऊनही ती मोडली. तुम्ही कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे विसरता येणार नाही. राजपाल यादव यांनी २०१० मध्ये 'अता पता लापता' या चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज घेतलं होतं, जे आता व्याजासह ९ कोटींवर पोहोचलं आहे.
advertisement
राजपाल यादव तिहार जेलमध्ये असले, तरी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी त्यांच्यासाठी कंबर कसली आहे. सोनू सूद याने सर्वात आधी मदतीचा हात पुढे करत राजपाल यांना आपल्या नवीन चित्रपटासाठी साईन केलं आणि भरघोस साइनिंग बोनसही दिला. सोनूने इतर सेलिब्रिटींनाही राजपाल यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
advertisement
राजपाल यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं आहे की, ९ कोटींपैकी आता केवळ २ कोटी रुपये देणं बाकी आहे आणि ते सोमवारी दुपारपर्यंत सेटल करण्याची तयारी आहे. "आम्ही सोमवारपर्यंत काहीतरी मार्ग काढू," अशी ग्वाही वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता १९ फेब्रुवारीला होणाऱ्या भाचीच्या लग्नात राजपाल उपस्थित राहणार की नाही, याचा निकाल सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत होणार आहे.









