advertisement

Thalipeeth Pizza : कधी थालीपीठ पिझ्झा खाल्ला का? खवय्यांची असते गर्दी, ट्राय तर करा

Last Updated:

पुणे शहर हे कायमच खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत प्रयोगशील मानले जाते. मिसळ, भेळ, वडापाव यांसोबतच नवनवीन फ्युजन पदार्थांना पुणेकर नेहमीच भरभरून प्रतिसाद देत असतात.

+
News18

News18

पुणे : पुणे शहर हे कायमच खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत प्रयोगशील मानले जाते. मिसळ, भेळ, वडापाव यांसोबतच नवनवीन फ्युजन पदार्थांना पुणेकर नेहमीच भरभरून प्रतिसाद देत असतात. अशीच एक वेगळी आणि हटके संकल्पना सध्या पुण्यातील कर्वेनगर भागात पाहायला मिळत असून थालीपीठ पिझ्झा हा पारंपरिक आणि आधुनिक चवीचा अनोखा संगम स्वामी समर्थ स्नॅक्स या छोट्या उपक्रमातून पुणेकरांच्या पसंतीस उतरला आहे.
कर्वेनगर भागात स्वामी समर्थ स्नॅक्स या नावाने गेली दोन वर्षे कैलास काळे आणि प्रांजल काळे हे दाम्पत्य खाद्यव्यवसाय करत आहे. सुरुवातीला एका छोट्या फूड कार्टपासून सुरू झालेला हा प्रवास आज दोन दुकानांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे बेकरीचा व्यवसाय बंद करून अवघ्या 50 हजार रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी या नव्या व्यवसायाची सुरुवात केली होती.
advertisement
प्रांजल काळे सांगतात की, माझे पती कैलास काळे पुण्यात नोकरी करत होते. नोकरीसोबत काहीतरी स्वतःचं सुरू करण्याची आमची इच्छा होती. कर्वेनगर परिसरात कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यांना हेल्दी तसेच वेगळं काहीतरी खायला आवडतं. त्यामुळे पारंपरिक थालीपीठाला थोडा आधुनिक ट्विस्ट देण्याचा विचार केला.
advertisement
सुरुवातीला चीज थालीपीठ तयार करण्यात आले. पारंपरिक थालीपीठ आणि चीज यांचा मिलाफ ग्राहकांना आवडू लागला. मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत पिझ्झा थालीपीठ ही संकल्पना सुरू केली. थालीपीठाच्या बेसवर भाज्या, सॉस आणि चीजचा वापर करून तयार होणारा हा पदार्थ विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. यासोबतच पारंपरिक, ऑथेंटिक थालीपीठही येथे उपलब्ध आहे.
advertisement
थालीपीठची किंमत अवघ्या 40 रुपयांपासून सुरू होते, त्यामुळे हा पदार्थ सर्वसामान्यांना परवडणारा आहे. गावाकडे आमचा केकचा व्यवसाय होता, पण पुण्यात काहीतरी वेगळं करण्याची मनापासून इच्छा होती. टेबलपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज दोन शॉपपर्यंत पोहोचला आहे, ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे असेही प्रांजल काळे यांनी सांगितले.
आज स्वामी समर्थ स्नॅक्सचा थालीपीठ पिझ्झा केवळ कर्वेनगरपुरता मर्यादित न राहता पुण्याच्या इतर भागांतूनही ग्राहकांना आकर्षित करत आहे. कमी भांडवल, नवी कल्पना आणि मेहनतीच्या जोरावर उभा राहिलेला हा व्यवसाय अनेक नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Thalipeeth Pizza : कधी थालीपीठ पिझ्झा खाल्ला का? खवय्यांची असते गर्दी, ट्राय तर करा
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement