आपल्याला जर आठवत असेल तर कोविडशी लढण्यासाठी विविध आयुर्वेदिक काढ्यांचा वापर केला गेला होता. याशिवाय प्राणायमं आणि काही होमिओपॅथिक औषधंसुद्धा कोविडवर प्रभावी ठरली होती. आधी सांगितल्याप्रमाणे कोविड प्रमाणे HMPV हा सुद्धा श्वसनयंत्रणेवर आघात करतो. त्यामुळे श्वसनयंत्रणेला फायद्याचे ठरणारे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांनी HMPV संक्रमणाला दूर ठेवता येऊ शकतं.
नव्या व्हायरसशी लढण्यासासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
advertisement
तुळशीचा चहा
तुळशीला आयुर्वेदात आणि हिंदूधर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. इतकंच काय तर तुळशीला इंग्रजीमध्ये Holy Basil असं म्हटलं जातं. तुळशीत अँटिऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटीफंगल सारखे गुणधर्म आहेत, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवून साथीच्या रोगापासून रक्षण करायला मदत करतात. याशिवाय तुळशीत असलेल्या दाहक विरोधी गुणधर्म वेदनेपासून आराम देतात. त्यामुळे सकाळी चहाच्या ऐवजी गरम पाण्यात तुळशीची पानं उकळवून केलेला तुळशीचा चहा किंवा काढा पिणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.
हळदीचं दूध
हळदीची ओळख नैसर्गिक अँटिबायोटिक अशी आहे. याशिवाय हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल, अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून सर्दी, खोकल्याच्या त्रासापासून आराम मिळतो. त्यामुळे विविध संक्रमणांचा धोका टळतो. जर तुम्हाला दूध पिणं आवडत नसेल तर तुम्ही गरम पाण्यात हळद टाकूनही ती पिऊ शकता.
आलं आणि मधाचा चहा
वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध टाकून पिणं फायद्याचं मानलं गेलंय. हे पाणी गरम करताना यात आल्याचा तुकडा टाकला तर आलं, मधाचा चहा पिणं आरोग्यासाठी फायद्याचा ठपू शकतो. आले आणि मधातले औषधी गुणधर्म सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या विकाराना दूर ठेऊ शकतात.
कोमट मीठ-पाण्याच्या गुळण्या
कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. याशिवाय घसा दुखणं, घसा खवखवण्याच्या त्रासावर देखील गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या व्यक्तीचा आवाज बसला असेल किंवा त्यांना इंफेक्शनमुळे अन्न गिळायला त्रास होत असेल तर मीठ पाण्याच्या गुळण्या केल्याने आराम मिळू शकतो.
गरम पाण्याची वाफ
सर्दी आणि खोकला किंवा श्वसनाच्या विकारांवर गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. यामुळे चोंदलेले नाक उघडायला मदत होते. श्वसनमार्गातला अडथळा दूर झाल्यामुळे श्वास घ्यायला मदत होते. गरम पाण्याची वाफ घेताना त्यात निलगिरीचे काही थेंब टाकल्यास जास्त फायद्याचं ठरतं.