Mpox in China: जगासाठी नवी डोकेदुखी, चीनमध्ये नव्या व्हायरसचा प्रकोप, मंकीपॉक्सचा नवा व्हायरस आढळून आल्याने एकच खळबळ
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Mpox virus outbreak in China: HMPV व्हायरसने चीनमध्ये हाहा: कार माजवला असतानाच आता पुन्हा एकदा चीनमध्ये नव्या व्हायरचा प्रकोप आढळून आलाय. चीनमध्ये क्लेड 1 बी, क्लेड आयबी या मंकीपॉक्स विषाणूचा नवीन प्रकार सापडल्याने खळबळ उडालीये.
मुंबई: कोरोना व्हायरसनंतर चीन पुन्हा जगासाठी डोकेदुखी ठरला आहे. गेल्या आठवड्यात चीनमध्ये आढलेल्या HMPV व्हायरसने चीनसह संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं होतं. अशातच भारतातही या व्हायरसचे रूग्ण आढळल्याने देशासह राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर आलीये. HMPV व्हायरसने चीनमध्ये हाहा: कार माजवला असतानाच आता पुन्हा एकदा चीनमध्ये नवा व्हायरसचा प्रकार आणि प्रकोप आढळून आलाय. चीनमध्ये क्लेड 1 बी, क्लेड आयबी या मंकीपॉक्स व्हायरसचा नवीन प्रकार सापडल्याने खळबळ उडालीये. क्लेड 1B हा मंकीपॉक्सचा एक अतिशय धोकादायक प्रकार मानला जातो. जो कांगोसह काही आफ्रिकन देशांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहे. या नव्या व्हायरसच्या प्रकोपानंतर चीनमधली आरोग्ययंत्रणा सतर्क झालीये. चायना सेंट्रल फॉर डिसीज अँड कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, देशात मंकीपॉक्स व्हायरसच्या सबक्लेड 1B स्ट्रेनचा प्रादुर्भाव वाढलाय. या व्हायरसने कांगोमधून चीनमध्ये प्रवेश केलाय. नव्या व्हायरसच्या प्रकोपानंतर झेजियांग, ग्वांगडोंग, बीजिंग आणि टियांजिनमधली आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर गेली असून व्हायरसला अटकाव घालण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
किती नवीन रूग्ण ?
चिनी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, चीनच्या विविध प्रांतात चार प्रकरणं सापडली आहेत. मात्र असं असलं तरीही मोठ्या प्रमाणात रूग्णांची काळजी घेतली जातेय. संक्रामित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवलं असून ज्यांचा गंभीर आजारांचा धोका आहे किंवा ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशावर चिनी प्रशासनाचं बारीक लक्ष आहे. याशिवाय कांगो आणि आफ्रिकन देशातून आलेल्या व्यक्तीवर ही लक्ष ठेवलं जातंय.
advertisement
नव्या व्हायरसची लक्षणं काय ?
MPOX सुरूवातीच्या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ आणि नागीण आजारासारखी लक्षणं दिसून येतात. यानंतर रूग्णांना ताप, किंवा थंडी वाजून ताप येतो.डोकेदुखी, अंगदुखी आणि घशाला सूज अशी लक्षणं काही रूग्णांमध्ये दिसून आली होती. सुरूवातीला त्वचेवर आलेल्या पुरळात नंतर फोड येऊन पू झाल्याचं दिसून येतं. हा त्रास चेहऱ्या पासून शरीराच्या कोणत्याही भागांवर अगदी गुप्तांगावरही होऊ शकतो. MPOX ची लक्षणे साधारणतः 2 ते 4 आठवड्यांपर्यंत दिसून येतात.
advertisement
चीनने केल्या या उपाययोजना:
Mpox चा नवीन व्हायरस सापडल्यानंतर कांगो किंवा अन्य आफ्रिकन बाधित देशातून येणाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. नवीन व्हायरस किंव मंकीपॉक्सशी संबंधित कोणतीही लक्षणं दिसल्यास आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. याशिवाय चीनी नागरिकांना उंदीर आणि माकडांपासून दूर राहाण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 09, 2025 7:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mpox in China: जगासाठी नवी डोकेदुखी, चीनमध्ये नव्या व्हायरसचा प्रकोप, मंकीपॉक्सचा नवा व्हायरस आढळून आल्याने एकच खळबळ