Cloves Benefits & Disadvantages: हिवाळ्यात लवंग खाणं फायद्याचं, मात्र ‘या’ लोकांनी रहावं चार हात दूर, करावा लागू शकतो विविध समस्यांचा सामना
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits & Disadvantages of cloves in Marathi: ‘लवंग’ हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असा एक मसाला आहे. मात्र लवंग ही उष्ण प्रवृत्तीची असल्याने आरोग्यविषयक समस्यांचा धोकाही उद्भवू शकतो. जाणून घेऊयात लवंग खाण्याचे फायदे आणि तोटे.
मुंबई : हिवाळ्यात बदलेल्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे अनेकांचा आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागतो. अगदी साध्या सर्दी, खोकल्यापासून विविध श्वसनाच्या विकारांचा त्रास अनेकांना होतो. अनेकांसाठी गुलाबी थंडीचा हिवाळा आजारपणामुळे डोकेदुखीचा ठरू शकतो. त्यामुळे अनेक जण औषधांसोबत रात्री झोपताना 2 लवंगा खाऊन झोपणं पसंत करतात. दातदुखी, हिरड्यांचा त्रास, किंवा श्वासाच्या दुर्गंधीवर लवंग गुणकारी आहे हे आपल्याला माहितीच आहे. मात्र रात्री लवंगा खाऊन झोपल्याने खरंच फायदा होतो का ? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण लवंग हा गरम मसाल्याचा एक प्रकार आहे, त्यामुळे रोज रात्री लवंग खाण्याने आरोग्यविषयक समस्यांचा धोकाही उद्भवू शकतो.
जाणून घेऊयात हिवाळ्यात रोज रात्री झोपाताना लवंग खाल्ल्याने फायदा होईल की नुकसान ?

लवंगाचे आरोग्यदायी फायदे
आयुर्वेदाचार्य डॉ. सरोज गौतम याचं म्हणणं आहे की, ‘लवंग हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असा एक मसाला आहे. लवंगाचं सेवन शरीरासाठी फायद्याचं मानलं जातं. लवंगात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे लवंग खाल्ल्याने निश्चितच काही फायदे होऊ शकतात. रात्री 2 लवंगा कोमट पाण्यासोबत खाल्ल्यास सर्दी, खोकला आणि घशाच्या संसर्गापासून आराम मिळतो. याशिवाय लवंगाचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म हिवाळ्यातल्या संक्रामित आजारांपासून शरीराचं रक्षण करायला मदत करतात. लवंगातल्या अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे जळजळ, दाहकतेचा त्रास कमी होतो. लवंग पाचक एंझाईम्सना उत्तेजित करते, ज्यामुळे अन्न सहज पचायला मदत होते त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. रात्री लवंग खाल्ल्याने अपचन, गॅसेस, आणि पोटफुगीच्या समस्या दूर होतात.’
advertisement
नैसर्गिक पेनकिलर : लवंगात युजेनॉल हे नैसर्गिक पेनकिलर प्रमाणे काम करतं. त्यामुळे दातदुखी, डोकेदुखी आणि स्नायूच्या दुखण्यावर आराम मिळू शकतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर: लवंगाचं सेवन हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. लवंगात असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचं रक्षण होतं. याशिवाय रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यातही लवंग फायदेशीर ठरते. यामुळे रक्तदाब नियंत्रित होऊन हृदयाचं आरोग्य सुधारतं.
advertisement
चांगली झोप येते: लवंग खाल्ल्याने शरीराला आराम मिळतो आणि झोपची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांसाठी रात्री लवंग खाणं फायद्याचं ठरतं.
अती तिथे माती
डॉ. सरोज गौतम यांच्या मते, लवंगाचे आरोग्यदायी फायदे जरी असले तरीही काही लोकांसाठी लवंग खाणं हे धोक्याचं ठरू शकतं.
advertisement
पचसंस्थेचा त्रास :- लवंग खाल्ल्यामुळे अन्न पचायला मदत जरी होत असली तरीही ज्यांना पचनसंस्थेचा त्रास आहे अशा व्यक्तीसाठी लवंग खाणं त्रासाचं ठरू शकतं. लवंग ही उष्ण प्रवृत्तीची असल्यामुळे लवंग खाल्ल्यामुळे त्यांना जळजळ, मळमळ किंवा अपचनचा त्रास होऊ शकतो.
गर्भवती महिला:- गर्भवती महिलांनी देखील लवंग खाणं टाळावं, अन्यथा प्रसुतीच्या दरम्यान गुंतागुंत वाढू शकते.
advertisement
लो ब्लडप्रेशर:- ज्यांना लो ब्लडप्रेशरचा त्रास आहे अशा व्यक्तींनी लवंगीला चुकूनही हात लावू नये. कारण लवंग खाल्ल्याने रक्तदाब आणखी कमी होण्याची भीती असते.
एलर्जी:- काही लोकांना लवंगीची ऍलर्जी असू शकते. त्यामुळे लवंग खाल्ल्ल्यानंतर जर तुमच्या त्वचेवर पुरळ उठले किंवा खाज यायला लागली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
अति लवंग धोक्याची:- लवंग ही दंतविकारांवर गुणकारी जरी असली तरीही जास्त लवंग जास्त खाल्ल्याने दातांच्या इनॅमलला हानी पोहोचते, ज्यामुळे दातांच्या समस्या तीव्र होऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 09, 2025 3:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cloves Benefits & Disadvantages: हिवाळ्यात लवंग खाणं फायद्याचं, मात्र ‘या’ लोकांनी रहावं चार हात दूर, करावा लागू शकतो विविध समस्यांचा सामना