प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ? करा हे सोपे 4 घरगुती उपाय, डोळ्यांना मिळेल आराम
- Published by:Tushar Shete
Last Updated:
प्रदूषणामुळे डोळे कोरडे पडणे, डोळ्यांची जळजळ, खाज आणि डोळ्यांना सूज येण्याचं प्रमाण वाढलंय. जर तुम्हालाही डोळ्यांचा असा काही त्रास होत असेल आणि या त्रासावर तुम्हाला नैसर्गिकरित्या घरच्या घरी काही उपाय करायचे असतील तर ही माहिती खास तुमच्यासाठी
मुंबई : सध्याच्या वातावरण बदलामुळे आणि वाढत्या प्रदुषणामुळे अनेक जण आजारी पडू लागलेत. अशातच पहाटेच्या वेळी पडणारं धुकं आणि प्रदूषणामुळे निर्माण होणारं धुरकं यामुळे डोळ्यांची जळजळ होण्याचे प्रमाण वाढू लागलंय. डोळे कोरडे पडणं, डोळ्यांची जळजळ, खाज आणि डोळ्यांना सूज येण्याचं प्रमाण वाढलंय. जर तुम्हालाही डोळ्याचा असा काही त्रास होत असेल आणि या त्रासावर तुम्हाला नैसर्गिकरित्या घरच्या घरी काही उपाय करायचे असतील तर ही माहिती खास तुमच्यासाठी.

डोळे थंड पाण्याने धुवा
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आणि डोळ्यांच्या स्नायूंवरील तणाव दूर करण्यासाठी डोळे दिवसातून अनेक वेळा थंड पाण्याने डोळे धुणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही एक स्वच्छ कापड थंड पाण्यात बुडवून तुमच्या डोळ्यांवर ठेवू शकता.
advertisement
टी बॅग्सचा वापर
प्रवासात चहा किंवा कॉफी पिण्यासाठी सहज उपयोगी पडणारी टी बॅग तुम्हाला डोळ्यांपासून आराम देऊ शकते.
ग्रीन टी किंवा कॅमोमाइल टी बॅग थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर ती 10-15 मिनिटे डोळ्यांवर ठेवू शकता. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात.
advertisement
गुलाब पाण्याचा वापर
गुलाब पाणी हे थंड असतं.डोळ्यांवर गुलाबपाणी लावल्याने जळजळ आणि सूज कमी होते. जेव्हा जेव्हा डोळ्यांना जळजळ होते, तेव्हा तुम्ही थोडा कापूस घ्या आणि गुलाब पाण्यात बुडवून डोळ्यांवर लावा. तुमचे डोळे शांत होतील.

advertisement
काकडीचा वापर
डोळ्यांच्या जळजळीवर तुम्हाला सर्वोत्तम उपाय हवा असेल तर एक काकडी दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर काकडीचे गोल तुकडे करा आणि ते तुकडे 10 मिनिटे डोळ्यांवर ठेऊन डोळे बंद करून झोपा. तुम्ही त्याचा रस काढून कापसात बुडवून डोळ्यांना लावू शकता.
या उपाययोजनांमुळे तुम्हाला आरामही मिळेल आणि कोणतीही हानी होणार नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला डोळ्यांना दुसरा कोणता त्रास असेल किंवा हे साधे उपाय करूनही तुम्हाला आराम वाटत नसेल तर तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2024 5:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ? करा हे सोपे 4 घरगुती उपाय, डोळ्यांना मिळेल आराम