ऐकावं ते नवलंच ! योगासनांमुळे होईल सौंदर्यात वाढ; त्वचेला मिळेल नैसर्गिक चमक, समस्या होतील नाहीशा

Last Updated:

योगासनांमुळे शारिरीक व मानसिक स्वास्थ लाभतं हे आपल्या सगळ्यांना माहितीये. पण तुमचा विश्वास बसणार नाही, काही योगासने तुम्हाला सुंदर बनवतात. या योगासनांमुळे त्वचा निरोगी आणि तेजस्वी होते जी सौंदर्यात वाढ करते.

ऐकावं ते नवलंच ! योगासनांमुळे होईल सौंदर्यात वाढ; त्वचेला मिळेल नैसर्गिक चमक
ऐकावं ते नवलंच ! योगासनांमुळे होईल सौंदर्यात वाढ; त्वचेला मिळेल नैसर्गिक चमक
Yoga poses for healthy skin योगासनांमुळे शारिरीक व मानसिक स्वास्थ लाभतं हे आपल्या सगळ्यांना माहितीये. पण तुमचा विश्वास बसणार नाही, काही योगासने तुम्हाला सुंदर बनवतात. या योगासनांमुळे त्वचा निरोगी आणि तेजस्वी होते जी सौंदर्यात वाढ करते. आपली त्वचा निरोगी आणि चमकदार असावी अशी सगळ्यांची, खासकरून महिला वर्गाची इच्छा असते. त्यासाठी विविध सौंदर्यप्रसाधनांचा आणि क्रिमचा वापर केला जातो.परंतु हे सर्व उपाय कायमस्वरूपी नसतात. कधीकधी ते त्वचेला हानी देखील पोहोचवू शकतात. जर तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने सुधारायची असेल, तर आम्ही सांगतो ती 4 योगासने करून पाहा.
धनुरासन
धनुरासन केल्याने ओटीपोटावर दबाव येतो. त्यामुळे पोटाभोवतालची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. यामुळे शरीरही डिटॉक्स होतं. यामुळे चेहरा आणि ओटीपोटात रक्त प्रवाह देखील वाढतो. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
advertisement
पश्चिमोत्तानासन
या योगासनात पाठीचा कणा, खांदे आणि मांडीच्या स्नायूंवर ताण येतो. यामुळे पाठीच्या खालच्या भागातला ताण कमी होतो, ज्यामुळे पचन सुधारतं. जेव्हा पचन सुधारते, तेव्हा वारंवार येणाऱ्या मुरुमांच्या समस्या कमी होतात. पश्चिमोत्तानासन रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतं यामुळे त्वचा उजळून निघते. पश्चिमोत्तानासनाच्या नियमित सरावाने काळे डाग आणि सुरकुत्या देखील कमी होतात.
advertisement
भुजंगासन
जर तुमची त्वचा कोरडी असेल आणि शरीरात अनेकदा कडकपणा जाणवत असेल तुम्ही भुजंगासन करावं असा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे फक्त पाठीचा आणि खांद्यांचा कडकपणा केवळ कमी होणार नाही, तर नियमित व्यायामामुळे मानसिक शांती देखील मिळेल. भुजंगासन, हे त्वचेला गुळगुळीत करायला मदत करते आणि चेहऱ्यावर चमक आणते,त्यामुळे त्वचा उजळण्यासही मदत होते.
advertisement
अधोमुख शवासन
या योगाच्या सरावामुळे शरीर आणि चेहऱ्याचा रक्त प्रवाह सुधारतो, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते त्वचा निरोगी आणि चमकदार होते. अधोमुख शवासनामुळे मनातली नकारत्मकता दूर व्हायला मदत होते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ऐकावं ते नवलंच ! योगासनांमुळे होईल सौंदर्यात वाढ; त्वचेला मिळेल नैसर्गिक चमक, समस्या होतील नाहीशा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement