advertisement

तो शेवटपर्यंत वाट पाहत होता..! जवळचे लोक गैरहजर, लग्नात नाराज झालेला सूरज चव्हाण; जान्हवी किल्लेकरचा खुलासा

Last Updated:
Janhavi Killekar on Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाणच्या लग्नात अनेक मोठ्या लोकांची गैरहजेरी पाहायला मिळाली. जवळचे लोक लग्नाला न आल्याने ऐन लग्नात सूरज चव्हाण नाराज झाला होता.
1/9
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणने डिसेंबर महिन्यात लग्न केलं. सूरज चव्हाणचं लग्न विशेष चर्चेत आलं होतं. सूरजने त्याच्या लग्नासाठी बिग बॉसच्या संपूर्ण टीमला आमंत्रण दिलं होतं. तसंच रितेश देशमुख, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आमंत्रण होतं. पण अनेकांची सूरजच्या लग्नात अनुपस्थिती पाहायला मिळाली.

2/9
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर मात्र सूरज चव्हाणच्या लग्नात करवली म्हणून मिरवली. लग्नाला कोणी आलं नाही याची खंत सूरजच्या मनात होती. लग्नाच्या दिवशी नेमकं काय घडलं हे जान्हवीनं पहिल्यांदाच सांगितलं. 

3/9
राजश्री मराठीशी बोलताना जान्हवी म्हणाली,
राजश्री मराठीशी बोलताना जान्हवी म्हणाली, "सूरजच्या लग्नात खूप मज्जा आहे. त्यांच्यात खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो पण त्यातही वेगवेगळ्या पद्धती असतात."
advertisement
4/9
 "मला तिथल्या पद्धती बघायला मज्जा आली. त्याचं सगळं लगेच होतं, साखरपुडा, हळद आणि लगेच लग्न. माझी टीम रेडीच होती. त्याच्या हॉलच्या समोरच मी हॉटेल बुक केलं होतं. म्हणजे मला लगेच चेंज करून येता येईल."

5/9
 बिग बॉसचे स्पर्धक त्याच्या लग्नात उपस्थित नसल्यामुळे सूरजला फार वाईट वाटलं असंही जान्हवीनं सांगितलं. ती म्हणाली,
 बिग बॉसचे स्पर्धक त्याच्या लग्नात उपस्थित नसल्यामुळे सूरजला फार वाईट वाटलं असंही जान्हवीनं सांगितलं. ती म्हणाली, "मी ठरवलेलं सूरजच्या लग्नाला जायचंच. इव्हेंट्स वगैरे होते ते कॅन्सल केलं. सूरजच्या लग्नाला जाणं महत्त्वाचं होतं."
advertisement
6/9
 "तो खूप साधा भोळा आहे. त्याला अपेक्षा होती की सगळे येतील लग्नाला. तो शेवटपर्यंत मला म्हणत होता की, जान्हवी हे बघ हा येणार आहे, तो येणार आहे. मीपण त्याला शेवटपर्यंत हो येणार, सगळे येणार असंच सांगत राहिले. पण आता प्रत्येकाचे काही प्रोब्लम्स असू शकतात म्हणून अटेंड करायला नाही जमलं."

7/9
 "सूरज थोडा नाराज झालेला त्या दिवशी की माझी जवळची माणसं नाही आली. पण मी होते. तो शेवटपर्यंत मला बोलला, जान्हवी कोणी नाही पण तू आलीस."

8/9
जान्हवी पुढे म्हणाली,
जान्हवी पुढे म्हणाली, "त्याने 50 बॉडीगार्ड ठेवले होते. त्याच्या लग्नात 4-5 बॉडीगार्ड्सच बेशुद्ध होऊन पडले एवढी गर्दी होती. त्याने इन्स्टावर पत्रिका टाकली त्यामुळे अख्या जगाला कळलं की सूरज चव्हाणचं लग्न कुठे होतं. त्याचं लग्न आहे म्हणजे, बिग बॉसची टीम येणार त्यामुळे खूपच गर्दी झालेली."
advertisement
9/9
 "लग्नाच्या दिवशी मी भडकलेल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. ज्या स्टेजवर लग्न लागणार होतं तिथे ऑडियन्स स्टेजवर, आता लग्न लावायचं कसं. 5.30 वाजताचं लग्न होतं पण 8 वाजले तरी लग्न लागेना. पुरूषोत्तम दादा देखील तिथे होते. ते म्हणाले तू बोल जरा. मी बोलले आणि पाचव्या मिनिटाला लग्न लागलं. अक्षता टाकल्या, चार फोटो काढले त्याला जे गिफ्ट आणलं होतं ते दिलं आणि आम्ही निघालो."

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement