फक्त इराणच नाहीतर.. डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं, भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Donald Trump : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धसंघर्षाला आता सुमारे ३३ दिवस पूर्ण झाले असून त्याचे परिणाम जागतिक स्तरावर जाणवू लागले आहेत.
मुंबई : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धसंघर्षाला आता सुमारे ३३ दिवस पूर्ण झाले असून त्याचे परिणाम जागतिक स्तरावर जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत कठोर भूमिका मांडली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहतुकीबाबत त्यांनी गंभीर इशारा देत, “जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत येथून तेलपुरवठा होणार नाही,” असे स्पष्ट केले.
जगभरातील देशांना कडक इशारा
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अमेरिकेला धमकी देणाऱ्या देशांवर कडक शब्दांत टीका करत, अशा शक्तींना संपविल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा दिला. त्यांनी दावा केला की, अमेरिकेने आपले लष्करी मिशन मोठ्या प्रमाणात पूर्ण केले असून युद्ध लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यांत परिस्थिती निर्णायक वळण घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
advertisement
आम्हाला गरज नाही
ट्रम्प पुढे म्हणाले की, अमेरिकेला लागणाऱ्या ऊर्जेची गरज मध्य-पूर्वेवर अवलंबून नाही. तेल आणि गॅस उत्पादनात अमेरिका जगात अग्रस्थानी आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला अमेरिका झुकणार नाही. युद्ध संपल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन सुरू राहणार
“ऑपरेशन एपिक फ्यूरी” सुरूच राहणार असल्याचे सांगत ट्रम्प यांनी अमेरिका अधिक सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचा दावा केला. इराणसोबत कोणताही करार करण्यास अमेरिका तयार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करून ती सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही त्यांनी नमूद केले.
advertisement
इराणच्या लष्करी क्षमतेवर मोठा परिणाम
इराणला अण्वस्त्रे तयार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी क्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, इराणची ड्रोन आणि क्षेपणास्त्र क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आली आहे. तसेच, इराणचे नौदल जवळपास संपुष्टात आले असून त्यांच्या लष्करी नेतृत्वालाही मोठा फटका बसल्याचे त्यांनी म्हटले. इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली.
advertisement
अमेरिकेचा मोठा विजय
ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले की, या संघर्षात अमेरिकेने मोठा विजय मिळवला असून युद्धाच्या इतिहासात इतक्या कमी कालावधीत एवढे मोठे नुकसान शत्रूला कधीच झाले नव्हते. इराणमध्ये सत्तांतर झाल्याचाही दावा त्यांनी केला.
याचवेळी, त्यांनी व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या कारवाईचा उल्लेख करत ती जलद आणि प्रभावी ठरल्याचे सांगितले. या कारवाईमुळे जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याची प्रचिती आल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात ऊर्जा स्रोतांच्या विकासावर अधिक भर दिला जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.
advertisement
एकूणच, ट्रम्प यांच्या वक्तव्यातून अमेरिका युद्धाच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचा दावा करत असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आणि अनिश्चित आहे. मध्य-पूर्वेतील घडामोडी आणि इराणकडून होणाऱ्या हालचाली लक्षात घेता, येणारे काही दिवस जागतिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 7:24 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
फक्त इराणच नाहीतर.. डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं, भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे










