Leftover Rajma Dishes : रात्रीचा राजमा उरलाय? फेकू नका, त्याच राजम्यापासून लंचसाठी बनवू शकता या 8 भन्नाट डिशेस!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
8 Unique Dishes From Leftover Rajma : घरी बऱ्याचदा रात्रीच्यावेळी केलेल्या काही भाज्या उरतात. तुमच्याकडे राजमा बनला असेल आणि तो उरला असेल तर टेन्शन घेऊ नका किंवा तो फेकूही नका. कारण त्यापासून तुम्ही काही भन्नाट डिशेस बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला उरलेल्या राजम्यापासून बनवता येणारे काही पदार्थ सांगत आहोत.
advertisement
राजमा चाट : चाट हे सर्वांचे आवडते स्ट्रीट फूड आहे. नेहमी बटाटे किंवा पालक पत्ता चाट खाया तुम्हाला आवडत असेल तर ही राजम्याची चाटही तुम्हाला नक्की आवडेल. यासाठी तुम्हाला फक्त चिरलेला कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, चाट मसाला आणि कोथिंबीर लागेल हे सर्व मिश्रण राजमा बीन्सवर घालून एकत्र करा. आणि त्यावर आंबट जिद्द चटणी आणि दही घाला. शेवटी शेव आणि कोथिंबीर पेरून सजवा.
advertisement
राजमा टिक्की किंवा कटलेट : टिक्की किंवा कटलेट तुमच्या दुपारच्या जेवणाचा भाग बानू शकतात. शिजवलेले राजमा, उकडलेले बटाटे, ब्रेडक्रंब आणि मसाले एकत्र करून मॅश करा. महाल हे प्रोटीन रिच बनवायचे असेल तर तुम्ही थोडे पनीरची यामध्ये घालू शकता. त्यानंतर याला टिक्की किंवा कटलेटचा आकार द्या आणि शॅलो-फ्राय करा. एखाद्या चटणीसोबत सर्व्ह करा.
advertisement
राजमा सँडविच : सॅन्डविचमध्ये भरण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सारण तयात करतो असेच तुम्ही राजम्याचेही सारण बनवू शकता. आणि विशेष म्हणजे हे मुलांनाही खूप आवडेल. यासाठी राजमा, बटर, मिरपूड आणि कोथिंबीर हलकेच मॅश करा आणि नंतर ते ब्रेडवर पसरवा. हे सँडविच तव्यावर किंवा सँडविच मेकरमध्ये ठेवून भाजून घ्या.
advertisement
राजमा पुलाव : बहुतांश लोकांच्या दुपारच्या जेवणात भात असतीच. मग जर रात्रीचा राजमा उरला असेल तर तुम्ही साधा भट ना करता, भात शिजवताना जीरा राईस किंवा व्हेज पुलावमध्ये बनवू शकता. याने तुमचे पोटही भरेल आणि इतर कार्ब्स घेण्याची गरज पडणार नाही. याच्यासोबत एखादा रायताही बनवा, म्हणजे एकंदरीत स्मोपूर्ण जेवण तयार होईल.
advertisement
राजमा सूप : तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण खरंच राजम्यापासून सूपही बनावट येऊ शकते. हिवाळ्यात तर ही परफेक्ट डिश आहे. यासाठी तुम्हाला व्हेज स्टॉक, लसूण आणि जिरे लागतील. व्हेज स्टॉकमध्ये सर्व साहित्य आणि राजमा घाला. त्यानंतर तिखट आणि मीठ आपल्याला हवे त्यानुसार घाला. हे मिश्रण 5-7 मिनिटे उकळवा. तुमचे हेल्दी टेस्टी राजमा सूप तयार आहे.
advertisement
advertisement
राजमा पराठा : याच्या नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की हे बनवणं किती सोपं आहे. यासाठी उरलेला राजमा कांदे, हिरवी मिरची आणि मसाल्यांसोबत मॅश करा आणि नंतर पराठ्यांसाठी स्टफिंग म्हणून वापरा. नेहमी सारखे पराठे लाटून ते तेल किंवा तूप लावू मस्तपैकी भाजा. तुमचा राजमा परत तयार आहे. (सर्व इमेज - Meta Ai)
advertisement









