advertisement

Parbhani Zilla Parishad election: अजितदादांची राष्ट्रवादी आघाडीवर, परभणीकरांनी दिला कौल, निकालाचा पहिला कल समोर

Last Updated:

परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी १० वाजता सुरू झाली आहे. पहिली पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे.

News18
News18
विशाल माने, प्रतिनिधी
परभणी :  परभरणी जिल्हा परिषद निवडणुकीकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आघाडीवर आहे. परभणी जिल्हा परिषदेसाठी एकूण ५४ जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. तर ९ पंचायत समितीसााठी १०८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी २४७ आणि पंचायत समितीसाठी ४३३ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यात विक्रमी ७४.८९ टक्के मतदान झालं आहे, ज्यात परभणी तालुका ८०.२७ टक्के नोंद झाली आहे. त्यामुळे परभणीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे.
advertisement
परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी १० वाजता सुरू झाली आहे. पहिली पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाच कल हाती आला असून राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे.   विशेष म्हणजे, नगर परिषद निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसने बाजी मारली होती. आता  जिल्हा परिषदेत महायुती भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट आणि महाविकास आघाडी शिवसेना-ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गटामध्ये थेट लढत आहे. महायुती आता नगरपरिषदेतल्या पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.
advertisement
-----------------------
परभणी जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा- 54
आघाडी
भाजप -
शिवसेना -
राष्ट्रवादी - 1
शिवसेना UBT - 1
काँग्रेस -
वंचित -
अपक्ष -
----------------------------------------------------
परभणी जिल्हा परिषदेत ६ बिग फाईट्स
झरी जिल्हापरिषद सर्कल - सोनल देशमुख ( शिवसेना उद्धव ठाकरे ) V/S दिलीप देशमुख ( भाजप )
advertisement
लोहगाव जिल्हापरिषद सर्कल - अजित वरपूडकर ( काँग्रेस ) V/S उत्कर्ष वरपूडकर ( भाजप )
दैठणा जिल्हापरिषद सर्कल - प्रेरणा वरपूडकर ( भाजप )V/S ज्योत्स्ना घाडगे ( काँग्रेस )
सिंगणापूर जिल्हापरिषद सर्कल - समशेर वरपूडकर ( भाजप ) V/S एकनाथ साळवे ( राष्ट्रवादी अजित पवार )
जांब जिल्हापरिषद सर्कल - संग्राम जामकर ( राष्ट्रवादी अजित पवार ) V/S बाळासाहेब रेंगे ( काँग्रेस )
advertisement
पेडगाव जिल्हापरिषद सर्कल - सुहास देशमुख ( शिवसेना शिंदे ) V/S संतोष देशमुख ( राष्ट्रवादी अजित पवार )
काय आहे समीकरण? 
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. परभणी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं. राष्ट्रवादीत पक्षफुटीनंतर  बाबाजानी दुर्राणी  हे अजित पवार गटात गेले  आणि राजेश विटेकर यांच्यासाठी तर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
advertisement
भाजपने यावेळी जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी संपूर्ण ताकदपणाला लावली. मेघना बोर्डीकर आणि रत्नाकर गुट्टे या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर निवडणुकीची धुरा सोपवली असून खास करून ग्रामीण भागात जास्त प्रचार केला आहे.  भाजपला आव्हान देण्यासाठी ठाकरे गट मैदानात आहे ठाकरे गटाकडून  खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. अनेक ठिकाणी दावाही केला असून  जिंतूर आणि सेलू पट्ट्यात ठाकरे गट करिष्मा करेल अशी चिन्हा आहे.
advertisement
वरपुडकर कुटुंबातून ५ जण मैदानात
तर नगरपरिषद निवडणुकीत  ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांचा करिष्मा पाहण्यास मिळाला होता. त्यामुळे  वरपुडकर  यांच्या कुटुंबातील ५ जण वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे कुटुंबात झालेला गृह कलह हा परभणीकरांच्या चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळे वरपुडकर कुटुंबातून कोण जिंकणार हे पाहण्याचं ठरणार आहेय
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parbhani Zilla Parishad election: अजितदादांची राष्ट्रवादी आघाडीवर, परभणीकरांनी दिला कौल, निकालाचा पहिला कल समोर
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement