मध्यरात्री 2 वाजताची वेळ!त्या 17 महिलांची अवस्था पाहून पोलिसही चक्रावले, आळंदीतील त्या खोलीत नेमकं काय दिसलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मंगळवारी मध्यरात्री जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत होते, तेव्हा पिंपरी-चिंचवड पोलिसांचे एक विशेष पथक आळंदी-चऱ्होली रोडवरील साई पॅलेस हॉटेलच्या दिशेने शांतपणे सरकत होते.
पिंपरी-चिंचवड: आळंदीच्या पवित्र पावन परिसरात एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आळंदी-चऱ्होली रस्त्यावरील 'साई पॅलेस' हॉटेलमध्ये सुरू असलेल्या एका आंतरराज्यीय देहविक्रीच्या रॅकेटवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १७ पीडित महिलांची नरकयातनांतून सुटका केली असून, हे रॅकेट चालवणाऱ्या ६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मध्यरात्री 2 वाजता पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'
मंगळवारी मध्यरात्री जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत होते, तेव्हा पिंपरी-चिंचवड पोलिसांचे एक विशेष पथक आळंदी-चऱ्होली रोडवरील साई पॅलेस हॉटेलच्या दिशेने शांतपणे सरकत होते. हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. हॉटेलच्या आत जे दृश्य दिसले ते पाहून पोलीसही चक्रावले.
advertisement
पैशांच्या आमिषाने महिलांना जाळ्यात ओढलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा सुरेश पाटील, राज मोहन शेट्टी, संजय अमीन बावरी, साबीर अक्तर अली, भरत बिराजदार आणि विक्रम हिरावढ या सहा जणांनी मिळून हे रॅकेट उभारले होते. गरिबीचा फायदा घेऊन आणि पैशांचे आमिष दाखवून या १७ महिलांना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलण्यात आले होते. या छाप्यात पोलिसांनी ५१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल आणि काही साहित्य जप्त केले आहे.
advertisement
आळंदी परिसरात संतापाची लाट
धार्मिक महत्त्व असलेल्या आळंदीच्या प्रवेशद्वारावरच असा घाणेरडा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस शिपाई महेश लाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 6:43 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मध्यरात्री 2 वाजताची वेळ!त्या 17 महिलांची अवस्था पाहून पोलिसही चक्रावले, आळंदीतील त्या खोलीत नेमकं काय दिसलं?






