चुकून ही औषधं मुलांच्या हाताला लागली तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हनुनच एक सोपा आणि सुरक्षित पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सोशल मीडियावर नितीन भारद्वाज या इन्फ्लुएन्सरने उंदीर घालवण्याचा एक सोपा उपाय सांगितला आहे. यामध्ये एक खास तेल वापरलं जातं, ज्याच्या तीव्र वासामुळे उंदीर स्वतःहून घरातून पळून जातात. त्यांनी हे तेल वापरण्याच्या 2 पद्धती सांगितल्या आहेत.
advertisement
उंदीर घालवण्यासाठी करा हा उपाय..
उंदरांना घरातून घालवण्यासाठी तुम्हाला 'टरपेंटाइन तेल' लागेल. हे तेल कोणत्याही किराणा दुकानात, हार्डवेअरच्या किंवा पेंटच्या दुकानात सहज मिळेल. विशेष म्हणजे हे जास्त महाग सुद्धा नाहीये. मात्र त्यासाठी उच्च-गुणवत्तेचं आणि शुद्ध टरपेंटाइन तेलच वापरा. काटा शुद्ध तेलाचा वास तीव्र असतो आणि त्यामुळेच उंदीर पळून जातील.
पहिली पद्धत..
या तेलाचा वापर तुम्ही दोन पद्धतीनं करू शकता. पहिल्या पद्धतीत 'टरपेंटाइन तेल' चा एक स्प्रे बनवा. यासाठी साधी स्प्रे बॉटल घ्या. ही बॉटल स्वच्छ असावी. आता या बॉटलमध्ये टरपेंटाइन तेल भरा. हे तेल थेट घराच्या त्या कोपऱ्यांमध्ये फवारा जिथे उंदीर असण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही हे सिंकखाली, सोफ्याच्या मागे किंवा कपाटाच्या कोपऱ्यांमध्ये स्प्रे करू शकता.
दुसरी पद्धत..
हे तेल तुम्हाला स्प्रे करायचं नसेल तर तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता. यासाठी तुम्हाला टरपेंटाइन तेल आणि कापूस लागेल. कापसाचे मोठे-मोठे गोळे बनवा. हे कापसाचे गोळे टरपेंटाइन तेलात बुडवा. हे तेलात भिजवलेले गोळे उंदीर जिथे असतात त्या सर्व ठिकाणी ठेवा. सिलेंडरमागे, वॉशबेसिनखालच्या पाईपजवळ, स्टोअर रूममध्ये, कपाटांवर आणि पडद्यांच्या मागे. तुम्ही हे गोळे ठेऊ शकता. रात्री उंदीर बाहेर आल्यानंतर या तेलाचा तीव्र वास त्यांना सहन होत नाही आणि ते घरातून पळतात.
उंदरांचे बिल जर घरात असेल तर ते त्या बिळामध्येही हा कापसाचा गोळा तुम्ही ठेऊ शकता. याच्या तीव्र वासाने उंदीर बिळातून बाहेर पडतात आणि वषापासून दूर घराबाहेर जातात. उंदीर घराबाहेर गेल्यानंतर तुम्ही ते बीळ सिमेंटने बंद करू शकता. जेणेकरून उंदराला पुन्हा घरात लपायला जागा मिळणार नाही.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
