advertisement

Success Story : नोकरी सोडली अन् अगरबत्तीची उभारली कंपनी, 2 भावांच्या जिद्दीची कहाणी

Last Updated:

रोहित सकपाळ आणि अभिषेक धुरी या दोन भावांनी मिळून कैवारी नावाचा स्वतःचा अगरबत्ती ब्रँड सुरू केला आहे. स्वदेशी, सुगंधी आणि विश्वासार्ह हा त्यांचा मुख्य उद्देश असून स्थानिक पातळीवर दर्जेदार उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

+
News18

News18

मुंबई : महाराष्ट्रातला अगरबत्ती ब्रँड निर्माण करण्याचे स्वप्न घेऊन भांडुपमधील रोहित सकपाळ आणि अभिषेक धुरी या दोन भावांनी मिळून कैवारी नावाचा स्वतःचा अगरबत्ती ब्रँड सुरू केला आहे. स्वदेशी, सुगंधी आणि विश्वासार्ह हा त्यांचा मुख्य उद्देश असून स्थानिक पातळीवर दर्जेदार उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
रोहित सकपाळ यांनी आपल्या करिअरमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करत महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यांनी बँकेत नोकरी केली तसेच एका अॅग्रीकल्चर कंपनीमध्ये सेल्स हेड म्हणून जबाबदारी सांभाळली आणि कोचिंग क्लासेसही घेतले. या सर्व अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षित नोकरी सोडून त्यांनी कैवारी ब्रँड उभा केला आणि आज ते स्वतः घराघरांत जाऊन अगरबत्ती विक्री करत आहेत.
advertisement
या व्यवसायात अभिषेक धुरी यांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. ते आर्थिक व्यवहार, जीएसटी, कर आणि इतर व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. दोघे भाऊ मिळून व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
या उपक्रमामागे केवळ नफा हा उद्देश नसून समाजासाठी काहीतरी करण्याची भावना आहे. रोहित यांचे ध्येय म्हणजे जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे विशेषतः महिलांचे सक्षमीकरण करणे. स्थानिक महिलांना कामाच्या संधी देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
advertisement
अभिषेक धुरी सांगतात की, मराठी माणसाने व्यवसायात उतरले पाहिजे आणि मेहनतीच्या जोरावर यश नक्की मिळते. ग्राहकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहे. त्यांनी 1 लाख अगरबत्ती विक्रीचे लक्ष्य ठेवले असून केवळ 20 दिवसांत 124 किलो अगरबत्ती विक्री करून त्यांनी उत्तम सुरुवात केली आहे.
कैवारी अगरबत्ती ब्रँड सोशल मीडियावरही उपलब्ध असून, ग्राहक इंस्टाग्रामद्वारे ऑर्डर देऊ शकतात. तसेच भांडुपमधील त्यांच्या दुकानाला भेट देऊनही उत्पादने खरेदी करता येतात. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर या दोन भावांची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरी सोडली अन् अगरबत्तीची उभारली कंपनी, 2 भावांच्या जिद्दीची कहाणी
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement