advertisement

Vastu Tips: भरगच्च तुळस दारात अशा ठिकाणी या दिशेला असणं शुभ; वैभवलक्ष्मीची घरावर कृपा राहते

Last Updated:

Tulsi Vastu Tips: धार्मिक शास्त्रानुसार, ज्या घरात तुळस असते, त्या घरात सुख, समृद्धी आणि चांगलं वातावरण कायम राहतं. तुळशीमध्ये काही प्रकार आहेत, पण दारात तुळस अत्यंत फायदेशीर मानली जाते. तुळस लावताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुळशीशी संबंधित वास्तुशास्त्राच्या नियमांविषयी जाणून घेऊया, तुळस तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करू शकते.

News18
News18
मुंबई : आपल्याकडे घरासमोर तुळस नसलेले घर सापडणं दुर्मीळ, हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत तुळस फार महत्त्वाची मानली जाते. तुळस औषधी तर आहेच पण तिला साक्षात देवीचेच एक रूप मानले जाते. तुळस दारात असणं आणि ती चांगली फुलणे याला शुभ मानलं जातं. धार्मिक शास्त्रानुसार, ज्या घरात तुळस असते, त्या घरात सुख, समृद्धी आणि चांगलं वातावरण कायम राहतं. तुळशीमध्ये काही प्रकार आहेत, पण दारात तुळस अत्यंत फायदेशीर मानली जाते. तुळस लावताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुळशीशी संबंधित वास्तुशास्त्राच्या नियमांविषयी जाणून घेऊया, तुळस तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करू शकते.
कोणतेही शुभ कार्य योग्य वेळी सुरू केल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. शास्त्रामध्ये तुळस लावण्यासाठी विशिष्ट दिवसही सांगितले आहेत. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी तुळस लावणे देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी विशेष आहे. पौर्णिमा आणि शुक्ल पक्ष हे तुळस लावण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानले जातात. या विशेष दिवशी तुळस लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीचा आलेख चढता राहतो, घरात एक सुखद वातावरण निर्माण होते.
advertisement
या दिवशी तुळस लावू नका - वास्तुशास्त्रानुसार, चुकीच्या वेळी तुळस लावल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. शनिवार आणि रविवारी घरात तुळस आणू नये. एकादशी आणि अष्टमीला तुळस लावण्याची चूक करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते, ज्यामुळे घरात आर्थिक संकट किंवा गरिबी येऊ शकते.
advertisement
तुळशीचे रोप नेमके कुठे ठेवावे?
तुळशीची शक्ती तिच्या योग्य दिशेत असते. चुकीच्या ठिकाणी ठेवलेले रोप चांगले हवे तसे परिणाम देत नाही. वास्तूनुसार, ईशान्य कोपरा तुळशीसाठी सर्वात पवित्र स्थान आहे. ही दिशा देवांचे निवासस्थान मानली जाते. ईशान्य दिशेत जागा नसल्यास, तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशा वापरू शकता. दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात उत्साही वातावरण नियमित राहते.
advertisement
तुळशीचे महत्त्वाचे नियम - घराची आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी तुळशीच्या काही नियमांचे पालन नक्की करावे. तुळशीच्या रोपाजवळ कधीही घाण किंवा कचरा ठेवू नका. तुळशीभोवतीची जागा नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवा. तुळशीचे रोप सुकले असेल, तर ते ताबडतोब काढून पवित्र नदी किंवा जलाशयात विसर्जित करा. दारात सुकलेली तुळस ठेवणं गरिबीचे प्रतीक मानले जाते. तुळशीचे रोप बाथरूम किंवा शौचालयाच्या भिंतीजवळ कधीही लावले जाणार नाही, याची काळजी घ्या.
advertisement
ज्योतिष आणि वास्तूशास्त्रानुसार, तुळस एक संरक्षक कवच म्हणून काम करते. तुळस विष्णूला अत्यंत प्रिय आहे. ती लावल्याने देवी लक्ष्मी तसेच श्री हरी विष्णूचा आशीर्वाद आपोआप मिळतो. तिच्या प्रभावाने घरातील निगेटिव्ह ऊर्जा कमी व्हायला मदत होते. योग्य पद्धतीनं तुळस लावणं कधीही उत्तम, म्हणजे त्याचे चांगले फायदे मिळतात.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: भरगच्च तुळस दारात अशा ठिकाणी या दिशेला असणं शुभ; वैभवलक्ष्मीची घरावर कृपा राहते
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement