advertisement

IPL 2026 : 14 कोटींच्या पोराची बॅटिंग पाहून धोनी अवाक... शॉट्स पाहून विश्वास बसेना, Video

Last Updated:

पाच वेळची आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्स 30 मार्चला गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापासून आयपीएल 2026 च्या त्यांच्या मोसमाला सुरूवात करणार आहे.

14 कोटींच्या पोराची बॅटिंग पाहून धोनी अवाक... शॉट्स पाहून विश्वास बसेना, Video
14 कोटींच्या पोराची बॅटिंग पाहून धोनी अवाक... शॉट्स पाहून विश्वास बसेना, Video
गुवाहाटी : पाच वेळची आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्स 30 मार्चला गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापासून आयपीएल 2026 च्या त्यांच्या मोसमाला सुरूवात करणार आहे. लागोपाठ 2 मोसम प्ले-ऑफमधून बाहेर राहिल्यानंतर सीएसके यंदा ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. आयपीएलच्या 19 व्या हंगामासाठी सीएसकेने मिनी ऑक्शनमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना टीममध्ये घेतलं. भारतीय युवा क्रिकेटपटू प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांना प्रत्येकी 14.2 कोटी रुपये देऊन सीएसकेने लिलावात विकत घेतलं.
चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात खेळाडूंचं ट्रेनिंग सेशन सुरू आहे. धोनी प्रॅक्टिस सेशनमध्ये टीमच्या युवा खेळाडूंचे शॉट्स जवळून पाहत आहे आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक करताना दिसत आहे. व्हिडिओमधली धोनीची रिएक्शन पाहून हे खेळाडू यंदाच्या मोसमात सीएसकेकडून सातत्याने खेळतील, असं वाटत आहे.
advertisement
व्हिडिओच्या सुरूवातीला प्रशांत वीर ऑफ साईडच्या दिशेने शानदार शॉट मारताना दिसत आहे, यावर धोनी 'शॉट' अशी प्रतिक्रिया देत आहे. तर पुढच्या बॉलवर प्रशांत वीरने स्कूप शॉट खेळला, ज्यावर धोनीने बाऊंड्रीचा इशारा केला. सगळ्यात शेवटची प्रशांत वीरने जोरदार स्ट्रेट ड्राईव्ह मारला, यानंतरही धोनीने प्रशांत वीरचं कौतुक केलं.

धोनीचा प्रशांतला सल्ला

advertisement
प्रशांत वीरने स्पोर्ट्सस्टारसोबत बोलताना धोनीसोबतच्या संभाषणाचा किस्सा सांगितला. धोनीने मला पैसे वाचवण्याचा सल्ला दिल्याचं प्रशांत म्हणाला. अचानक मिळालेल्या या पैशांनंतर पाय जमिनीवर ठेव, असं धोनीने मला सांगितल्याचं प्रशांत वीर म्हणाला आहे.
प्रशांत वीर उत्तर प्रदेशकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. डावखुरा स्पिनर असल्यासोबतच प्रशांत वीर उत्कृष्ट बॅटरही आहे. प्रशांत वीरने आतापर्यंत 3 प्रथम श्रेणी सामने, 8 लिस्ट ए आणि 9 टी-20 मॅच खेळल्या आहेत. प्रथम श्रेणीमध्ये प्रशांतने 7 रन करून 2 विकेट घेतल्या. ऑलराऊंडर म्हणून प्रशांतने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयपीएलच्या या मोसमात प्रशांत त्याच्या ऑलराऊंड खेळीने टीमला प्ले-ऑफपर्यंत नेईल, अशी अपेक्षा सीएसके आणि चाहत्यांची आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 14 कोटींच्या पोराची बॅटिंग पाहून धोनी अवाक... शॉट्स पाहून विश्वास बसेना, Video
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement