ज्याला जीव लावला त्यानेच पोत्यात भरलं अन्....नाशिकच्या नर्सची मर्डर मिस्ट्री उलगडली
- Reported by:BABBU SHAIKH
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका नर्सचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून हा निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, निफाड पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
निफाड तालुक्यातील देवपूर परिसरातून 15 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या रंभाबाई काळे या महिलेची हत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा बजावणाऱ्या रंभाबाई यांचा त्यांच्याच प्रियकराने गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी निफाड पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून आरोपी अरुण ढेपले याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
advertisement
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीची कबुली
रंभाबाई काळे या गेल्या 15 दिवसांपासून अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे रंभाबाई यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली असता अरुण ढेपले याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने रंभाबाई यांची हत्या केल्याची कबुली दिली.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, रंभाबाई आणि अरुण यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच अरुणने रंभाबाई यांचा गळा आवळून जीव घेतला. हत्या केल्यानंतर पकडले जाऊ या भीतीने त्याने मृतदेह एका पोत्यात भरला. मृतदेह पाण्यावर तरंगू नये म्हणून त्या पोत्यात जड दगड भरले आणि ते देवपूर परिसरातील एका निर्जन विहिरीत फेकून दिले. 15 दिवसांनंतर हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला आहे.
advertisement
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
निफाड पोलिसांनी आरोपी अरुण ढेपले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून देवपूर परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 5:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
ज्याला जीव लावला त्यानेच पोत्यात भरलं अन्....नाशिकच्या नर्सची मर्डर मिस्ट्री उलगडली







