advertisement

रस्त्यावरील दुकानदारांकडून भाजी घेताय? थांबा! ते कुठे आणि कशी भाजी साठवतात ते पाहा, हा Video पाहून 10 वेळा विचार कराल

Last Updated:

लोअर परेल स्टेशनबाहेरील हा धक्कादायक प्रकार पाहून तुम्ही पुन्हा कधीही रस्त्यावरून भाजी घेणार नाही! कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ठेवलेली भाजी आणि त्यावर ताव मारणारे उंदीर... हे दृश्य काळजाचा ठोका चुकवणारे आहे.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : आपण रोजच्या धावपळीत ऑफिसवरून घरी जाताना रेल्वे स्टेशनबाहेरून किंवा रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजीवाल्यांकडून भाजी खरेदी करतो. दिसायला ताजी आणि स्वस्त वाटणारी ही भाजी आपल्या ताटापर्यंत कशी पोहोचते, याचा आपण कधी विचार केला आहे का? लोअर परेल परिसरातून समोर आलेला एक व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा रस्त्यावरून भाजी घेताना शंभरवेळा विचार कराल.
नेमकं प्रकरण काय?
ही धक्कादायक घटना मुंबईतील लोअर परेल स्टेशनच्या अगदी जवळ घडली आहे. 23मार्च रोजी दुपारी टॅक्सी स्टँडच्या बाजूला असलेल्या एका अत्यंत अस्वच्छ आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ भाजी साठवून ठेवण्यात आली होती. या घाणीत वांगी, फ्लॉवर, गवार आणि भेंडी यांसारख्या भाज्या एका गोणीत झाकून ठेवलेल्या होत्या. सर्वात भयानक दृश्य म्हणजे, या साठवलेल्या भाज्यांवर उंदीर ताव मारत होते. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की, कशाप्रकारे उंदीर फ्लॉवर कुरतडत आहेत. ही तीच भाजी आहे जी आपण विश्वासाने घरी नेतो आणि शिजवून खातो.
advertisement
अनेकदा हे भाजीवाले अशी कुडतडलेली भाजी वरचीवरची काढून ती विकण्यासाठी ठेवतात किंवा तोडून मोडून भाजी साफ करुन विकायला ठेवतात. किंमत कमी असल्यामुळे आपण देखील अशी भाजी घेतो, कारण ती वरुन दिसायला चांगली असते. पण त्यामागचं सत्य किंवा ती कुठून आली हे आपल्याला माहित नसतं.
[video width="720" height="1280" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-23-at-5.26.37-PM-2026-03-e7a714db961a735dfb8f6f78ed6d4141.mp4"][/video]
उर्मी ऑफिस कॉर्नरवरील 'तो' भाजीवाला
मिळालेल्या माहितीनुसार, ही अस्वच्छ ठिकाणी साठवलेली भाजी समोरच असलेल्या 'उर्मी ऑफिस'च्या कोपऱ्यावर बसणाऱ्या भाजीवाल्याची आहे. दिवसभर ही भाजी ग्राहकांना विक्रीसाठी ठेवली जाते, पण तिची साठवणुकीची पद्धत मात्र खूपच घाणेरडी आणि किळसवाणी आहे. हे पहिल्यांदा झालेली घटना नाही तर असं अनेकदा होत असं असं तेथील टॅक्सीवाल्यांचं म्हणणं आहे.
advertisement
उंदरांनी विष्ठा केलेली भाजी खाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण
अस्वच्छ ठिकाणच्या आणि उंदरांनी खाल्लेल्या भाज्या खाणे हे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे खालील गंभीर आजार होऊ शकतात:
लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis): उंदरांच्या लघवीवाटे पसरणारा हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
प्लेग आणि इतर संसर्ग: उंदरांमुळे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
पोटाचे विकार: कचऱ्याच्या ठिकाणची घाण आणि जंतू थेट आपल्या शरीरात जातात, ज्यामुळे टायफॉइड आणि कॉलरासारखे आजार बळावतात.
advertisement
दोन पैसे वाचवण्यासाठी किंवा घाईत स्टेशनबाहेरून भाजी घेताना आपण स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी खेळ करत आहोत का? हा व्हिडिओ एक इशारा आहे. भाजी घेताना ती कुठून येते, ती कशी साठवली जाते याची खात्री करा. केवळ दिसायला चकचकीत दिसते म्हणून फसू नका.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
रस्त्यावरील दुकानदारांकडून भाजी घेताय? थांबा! ते कुठे आणि कशी भाजी साठवतात ते पाहा, हा Video पाहून 10 वेळा विचार कराल
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement