advertisement

Weekly Horoscope: मार्चचा चौथा आठवडा कोणासाठी लकी? मेष ते मीन 12 राशींचे साप्ताहिक राशीफळ

Last Updated:
Weekly Horoscope: मार्च महिन्याचा शेवटचा पूर्ण आठवडा 23 मार्चपासून सुरू होत आहे. या आठवड्यात कोणत्या राशींना कोणत्या गोष्टी मिळतील, कोणाला कशापासून सावध राहावे लागेल याबाबत ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी साप्ताहिक राशीभविष्य अंदाज वर्तवले आहे. या आठवड्यात काही लोकांना पदोन्नती किंवा परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन कसे असेल, पाहुया सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीफळ.
1/12
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साहाचा असेल. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा काळ तुमच्यासाठी खूपच प्रगतिकारक असेल. कामात जी काही मेहनत आणि जिद्द दाखवाल त्याचे पूर्ण फळ तुम्हाला या आठवड्यात नक्की मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी मोठी आणि सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बढती किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असाल तर तुमची ही इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि त्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. मेष राशीचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना मोठे यश मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती नांदेल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादे न्यायालयीन प्रकरण तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अडचणी आता पटापट सुटताना दिसतील. काहींसाठी प्रेमविवाहाचे योग जुळून येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि आरोग्य सामान्य ठीक असेल. शुभ रंग तपकिरी आणि शुभ अंक 9 आहे.

2/12
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपली कामाचं काटेकोरपणे नियोजन करावे लागेल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चाच्या सवयीवर लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक गणित फार बिघडेल. वृषभेचे जे लोक बेरोजगार आहेत, नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासावर लक्ष देणे गरजेचे आहे, तरच त्यांना हवे तसे निकाल मिळतील. प्रेमसंबंधांमध्येही एखाद्या कारणावरून दुरावा येऊ शकतो. अशा वेळी रागाच्या भरात किंवा रागात प्रश्न सोडवण्याऐवजी बोलून मार्ग काढा. मालमत्तेचे प्रश्न किंवा घरगुती वाद सामोपचाराने मिटवणे हिताचे ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, विशेषतः पोटाशी संबंधित तक्रारी किंवा संसर्ग होण्याची शक्यता आहे. शुभ रंग मॅजेंटा आणि शुभ अंक 8 आहे.

3/12
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अपेक्षित फळ देणारा आणि भाग्योदयाचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांची अनपेक्षित प्रगती होईल. कामात वरिष्ठ तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात, ती पूर्ण केल्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला एखाद्या नामांकित संस्थेकडून चांगली ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांना मोठा नफा कमवण्याचे चान्स आहेत. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. मात्र, जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांनी आर्थिक व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रेम जीवन अत्यंत सुखद राहील आणि जोडीदाराचे प्रत्येक पावलावर तुम्हाला सहकार्य लाभेल. शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 5 आहे.

4/12
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच चांगला असेल. तुमच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. जमीन, मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता साकार होईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यामध्ये काही कायदेशीर किंवा कौटुंबिक अडचणी येत असतील, तर एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने ते दूर होतील. एखादा मोठा प्रकल्प किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा आठवडा त्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. नोकरीमध्ये तुमचे वरिष्ठ आणि सहकारी यांच्याशी असलेले संबंध चांगले होतील. आर्थिक स्थिती सुधारेल, तुमचे सेव्हिंग वाढेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा आठवडा विशेष यशाचा आहे, परीक्षेत तुम्हाला हवे तसे यश मिळेल. वैवाहिक आयुष्य सुखाचे राहील. शुभ रंग नारंगी आणि शुभ अंक 9 आहे.

5/12
सिंह - सिंह राशीसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्यावर कामाचा आणि विविध जबाबदाऱ्यांचा ताण वाढेल.  कामे वेळेत पूर्ण करण्याचे एक मानसिक दडपण तुमच्यावर असेल. साधी आणि छोटी कामे पूर्ण करण्यासाठी देखील तुम्हाला या आठवड्यात अधिक श्रम आणि कष्ट घ्यावे लागतील. आठवड्याच्या मध्यात घरी एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात कोणताही निर्णय घाईघाईने किंवा रागाच्या भरात घेऊ नये, नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामासोबतच आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ऋतू बदलामुळे होणारे आजार किंवा एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. ताणतणाव कमी करण्यासाठी योगा किंवा ध्यान धारणेचा अवलंब करा. शुभ रंग गुलाबी आणि शुभ अंक 2 आहे.

6/12
कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात नीट नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा जास्त सक्सेस मिळू शकेल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी या आठवड्यात चालून येतील. विशेषतः परदेशी कंपन्यांशी संबंधित असलेल्या किंवा आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. तुम्ही आखलेल्या योजनांना यश मिळेल आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता चांगला परतावा मिळण्यास सुरुवात होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे, तुम्हाला सहकाऱ्यांकडून पूर्ण मदत मिळेल, टार्गेट वेळेत पूर्ण करू शकाल. कामातील प्रगतीमुळे तुम्हाला मानसिक समाधान आणि आनंद मिळेल. आठवड्याच्या मध्यात एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन अचानक होऊ शकते. लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी चांगली स्थळं येतील. वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. शुभ रंग लाल आणि शुभ अंक 3 आहे.

7/12
तूळ - काळजी घेतली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते, हे तूळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात प्रकर्षाने लक्षात ठेवावे. थोडासा निष्काळजीपणा एखाद्या चांगल्या चाललेल्या कामात अडचण निर्माण करू शकतो. शारीरिक इजा किंवा अपघाताची भीती असल्याने वाहन चालवताना अत्यंत सावध राहा. आठवड्याच्या सुरुवातीलाच अचानक मोठा खर्च समोर आल्याने तुमचे आर्थिक बजेट कोलमडू शकते. या काळात घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांची काळजी घेणे गरजेचे असेल. नोकरीमध्ये गुप्त शत्रू किंवा प्रतिस्पर्धी तुमच्या विरोधात कट रचू शकतात, कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आपले काम स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, ते दुसऱ्यावर सोपवल्यास नुकसान होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा असेल, नफा अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्याने थोडा मानसिक ताण येईल. शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 9 आहे.

8/12
वृश्चिक - प्रगतीसाठी दोन पावले मागे जावे लागले, तर मागे हटू नका. वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत आणि समस्या सोडवण्यासाठी इतरांचे सहकार्य घेणे आणि मिळून मिसळून काम करणे फायद्याचे ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आपली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतील. आठवड्याच्या पूर्वार्धात तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाला जावे लागू शकते. प्रवासात असताना आपल्या आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्या. व्यवसायात अपेक्षित वाढ आणि नफा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या धोरणांमध्ये बदल करावा लागेल. आठवड्याच्या मध्यात घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल. मुलांच्या शिक्षणामुळे किंवा त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायाची गती थोडी मंद असली तरी प्रगती होत राहील. प्रेमसंबंधांमध्ये कोणताही दिखावा टाळा आणि एकमेकांमधील सामंजस्य वाढवण्यावर भर द्या. शुभ रंग नारंगी आणि शुभ अंक 1 आहे.

9/12
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मेहनतीच्या प्रमाणात थोडे कमी फळ देणारा ठरू शकतो, ज्यामुळे मनात थोडी निराशा दाटून येईल. आठवड्याच्या सुरुवातीला घर, कुटुंब, करिअर आणि व्यवसायामध्ये काही प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांकडून आणि हितचिंतकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही, ज्यामुळे तुम्ही थोडे एकाकी पडल्यासारखे वाटेल. कामाच्या ठिकाणी अचानक झालेल्या बदलांमुळे किंवा नवीन नियमांमुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तो निर्णय भावनेच्या भरात किंवा घाईने घेऊ नका, अन्यथा भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. बाजारात तुमची पत टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. धनु राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात इतरांशी वाद घालण्याऐवजी समन्वयाने वागणे हिताचे ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक ओढाताण होऊ शकते. नात्यांच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा असून कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता तुम्हाला सतावू शकते. शुभ रंग तपकिरी आणि शुभ अंक 4 आहे.

10/12
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ काळ असेल. तुमची सर्व नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील, ज्यामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला लोकांचे सहकार्य आणि प्रेम मिळेल. करिअरमध्ये मोठी भरारी मारण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक केवळ सहकाऱ्यांकडूनच नाही तर वरिष्ठांकडूनही होईल. तुम्ही कंत्राटी पद्धतीने किंवा कमिशनवर काम करत असाल, तर एखादा मोठा प्रकल्प तुमच्या हाती लागण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन आणि अतिरिक्त स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. तुमचे व्यावसायिक आयुष्य अत्यंत सुखकर राहील. आठवड्याच्या मध्यात सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एखाद्या मोठ्या पदाने किंवा पुरस्काराने सन्मानित केले जाऊ शकते. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिकांना आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर अपेक्षित नफा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून आता धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि तुम्ही आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदाराशी उत्तम समन्वय राहील. शुभ रंग मॅजेंटा आणि शुभ अंक 1 आहे.

11/12
कुंभ - कुंभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र फळांचा असेल. पूर्वीच्या तुलनेत परिस्थिती थोडी कठीण वाटू शकते. विनाकारण कामासाठी होणारी धावपळ तुम्हाला थकवून टाकेल. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाच्या कारणास्तव लांबचा प्रवास करावा लागू शकतो, मात्र हा प्रवास अपेक्षेपेक्षा कमी फायदेशीर आणि थकवणारा ठरेल. व्यावसायिकांनी या आठवड्यात कोणत्याही प्रकारची जोखमीची गुंतवणूक करणे टाळावे. आर्थिक व्यवहारांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगा, कारण पैशाचे नुकसान होण्याची भीती आहे. आठवड्याच्या मध्यभागी खर्च उत्पन्नापेक्षा जास्त झाल्यामुळे तुम्हाला मानसिक चिंता सतावेल. कुंभ राशीच्या व्यक्तींनी करिअर किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा तुम्ही कायदेशीर कचाट्यात अडकू शकता. नात्यांच्या दृष्टीने हा काळ थोडा प्रतिकूल असू शकतो. भावंडांशी एखाद्या जमिनीच्या किंवा घरगुती कारणावरून वाद होऊ शकतो. प्रेम जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा मान राखावा लागेल. वैवाहिक आयुष्यात अहंकार आणि गैरसमज वाढू देऊ नका, अन्यथा नात्यात दुरावा येईल. सासरच्या मंडळींशी बोलताना संयम राखा. शुभ रंग जांभळा आणि शुभ अंक 4 आहे.

12/12
मीन - मीन राशीसाठी हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्हाला अनेकदा गोष्टी वेगाने सुधारताना दिसतील तर कधी अचानक बिघडताना जाणवतील. नोकरी करणाऱ्या लोकांनी या आठवड्यात कामात कोणतीही निष्काळजीपणा करू नये, अन्यथा वरिष्ठांच्या संतापाला सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे पाय ओढणारे किंवा गुप्त शत्रू प्रयत्नशील असतील, त्यामुळे सावध राहा. व्यावसायिकांना मार्केटमध्ये अडकलेले पैसे वसूल करण्यासाठी खूप कष्ट आणि पाठपुरावा करावा लागेल. या आठवड्यात खर्चाचे प्रमाण उत्पन्नापेक्षा जास्त राहील, ज्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती आहे. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात आणि हे प्रकरण कोर्टापर्यंत जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून काम करून घेणे तुमच्यासाठी एक आव्हान ठरेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासातील लक्ष कमी होऊन त्यांचे मन इतर गोष्टींमध्ये भरकटू शकते. मात्र, आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या भेटीमुळे घरातील वातावरण पुन्हा आनंदी होईल. अचानक एखाद्या सहलीचा किंवा पिकनिकचा बेत ठरू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये सामाजिक मर्यादा पाळणे गरजेचे आहे, अन्यथा बदनामी होण्याची भीती आहे. कठीण काळात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. शुभ रंग निळा आणि शुभ अंक 6 आहे.

जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement