advertisement

Iran War: इराणचा 'महाप्रकोप' 'लिटील इंडिया'वर कोसळला, जीवघेण्या क्षेपणास्त्रांनी मराठमोळ्या भागात हाहाकार, इस्रायल हादरला! PHOTOs

Last Updated:
Iran Israel Conflict: इराण-इस्रायल संघर्षामध्ये, इराणचे सर्वात प्रभावी शस्त्र म्हणून त्याची क्षेपणास्त्रे सिद्ध झाली आहेत. इराणला इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना परतवून लावणे शक्य झाले नसले, तरी आपल्या अत्यंत घातक क्षेपणास्त्रांचा वा पर करून ते इस्रायलमध्ये हाहाकार माजवत आहे. डिमोना आणि अराद या शहरांवर केलेल्या हल्ल्यांनंतरची परिस्थिती दर्शवणारे फोटो समोर आली आहेत.
1/8
शनिवारी इराणने दक्षिण इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा एक मोठा हल्ला चढवला. या हल्ल्यात 'अराद' शहराचे सर्वाधिक नुकसान झाले. या हल्ल्यात लहान मुलांसह सुमारे १०० लोक जखमी झाले. याव्यतिरिक्त, इराणने 'लिटल इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'डिमोना' शहरावरही क्षेपणास्त्र डागलं.

2/8
इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा इराणची क्षेपणास्त्रे रोखण्यात अपयशी ठरली. ज्यामुळे ती क्षेपणास्त्रे थेट नागरी वस्त्यांवर जाऊन आदळली. या इराणी हल्ल्याने संपूर्ण प्रदेशात प्रचंड हाहाकार माजवला. हा हल्ला खूपच भीषण होता. थरकाप उडवणारे फोटो समोर आले आहेत.

3/8
या हल्ल्याचा सर्वाधिक तीव्र परिणाम 'अराद' शहरात दिसून आला. येथे किमान ६८ लोक जखमी झाले; त्यांपैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, तर १४ जणांना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. उर्वरित व्यक्तींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. काही इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी आगी भडकल्या.

4/8
वृत्तांनुसार, निवासी इमारतींच्या मधोमध एक क्षेपणास्त्र आदळले. ज्यामुळे लगतच्या घरांचे नुकसान झाले आणि आग भडकली. या घटनेनंतर, त्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. इराणच्या हल्ल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पहिल्यांदाच समोर आले.

5/8
या घटनेनंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकलेले असू शकतात, अशी भीती मदत आणि बचाव पथकाला आहे. इस्रायलच्या आपत्कालीन सेवा संस्था 'मागेन डेव्हिड ॲडोम'चे प्रमुख एली बिन यांनी अनेक लोक बेपत्ता असण्याचीही शक्यता वर्तवली.

6/8
या हल्ल्यानंतर, सोरोका रुग्णालयात 'सामूहिक जीवितहानीची परिस्थिती' (Mass-casualty situation) जाहीर करण्यात आली. या ठिकाणी सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. आपली हवाई संरक्षण यंत्रणा या क्षेपणास्त्रांना रोखण्यात अपयशी का ठरली, याप्रकरणी इस्रायली लष्कराने चौकशी सुरू केली आहे. लष्कराच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, जरी ही यंत्रणा कार्यरत होती, तरीही ती संबंधित क्षेपणास्त्र रोखू शकली नाही. या घटनेतून पुढील काळात योग्य ती खबरदारी घेतली जाईल.

7/8
डिमोना शहरात जवळपास ३० टक्के लोकसंख्या म्हणजे सुमारे ७,५०० भारतीय वंशाचे ज्यू राहतात. यातील बहुतांशी जण जे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. येथे अनेक घराघरात मराठी बोलली जाते

8/8
इराणच्या नतांझ या अणू प्रकल्पावर हल्ला केला. इराणचं आण्विक केंद्र उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलच्या डिमोना शहरावर हल्ला केला. डिमोना शहरात इस्रायलचा अणू प्रकल्प आहे. इराणच्या हल्ल्यात डिमोना येथील अणू संशोधन केंद्र सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
इराणच्या नतांझ या अणू प्रकल्पावर हल्ला केला. इराणचं आण्विक केंद्र उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलच्या डिमोना शहरावर हल्ला केला. डिमोना शहरात इस्रायलचा अणू प्रकल्प आहे. इराणच्या हल्ल्यात डिमोना येथील अणू संशोधन केंद्र सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. (All Photos Credit- Reuters)
advertisement
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement