फोनमध्ये नेटवर्क येत नाही का? 90% लोकांना माहितीच नसतं खरं कारण, लगेच घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
फोनवर बोलत असताना अचानक नेटवर्क गायब होणं ही सामान्य समस्या वाटते. पण वारंवार असं होत असेल तर अडचणी येतात. हीच समस्या दूर करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया.
मुंबई : आजच्या काळात एकही असा व्यक्ती दिसणार नाही जो फोन वापरत नाही. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन हा अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मोबाईल नेटवर्क हा खुप गरजेचा झालाय. कॉल करणे, मेसेज पाठवणे, इंटरनेटचा वापर करणे - सर्व काही यावरच अवलंबून आहे. पण अचानक फोनचं नेटवर्क गायब होतं. कधी कधी ‘No Service’/ ‘Emergency Calls Only’ असंही दिसतं. ही खुप सामान्य समस्या आहे. पण लोकांना वाटतं की, ही कंपनीची चूकेय.
समस्या काय असते?
काही कारणं ही नेटवर्कशी संबंधित असतात काही फोन किंवा सिमशी संबंधित तर काही आपल्या लोकेशनशी संबंधित असतात.
सर्वात मोठं कारण म्हणजे सिग्नल पोहोचण्यात अडचण
या समस्येचे सर्वात मोठे कारण म्हणजे सिग्नल कमकुवत असणे आहे. मोबाईल टॉपवरपासून दूर असल्यावर किंवा मध्येच रुंद भिंत, उंच इमारती किंवा झाडे-झुडपे किंवा डोंगर असल्यास सिग्नल ब्लॉक होऊ शकते. शहरांमध्ये हाय-राइज बिल्टिंग्स किंवा ग्रामिण भागांमध्ये टॉवर कमी असल्याने अचानक नेटवर्क ड्रॉप होते. तुम्ही लिफ्टमध्ये, बेसमेंट किंवा मेट्रोमध्ये जात तेव्हाही लगेच सिग्नल गायब होऊ शकतं.
advertisement
नेटवर्क कंजेशन
पीक टाइममध्ये ही समस्या येऊ शकते. म्हणजेच संध्याकाळी 6-9 वाजता, सण-उत्सवात, मॅच किंवा मोठ्या इव्हेंट दरम्यान लाखो लोक एकाच टॉवरशी कनेक्ट होतात. यामुळे नेटवर्क ओव्हरलोड होते आणि सिग्नल अचानक खाली येते. भारतात यूझर्सची संख्या खुप जास्त आहे. म्हणूनच मोठी शहरं किंवा ऑफिसच्या परिसरात ही समस्या समान्य आहे.
advertisement
टॉवर दूर असल्यास किंवा मेंटेनेंस
तुमचा एरिया टॉवरपासून खुप दूर असेल किंवा टॉवरवर मेंटेनेंस/रिपेयरचं काम सुरू असेल तर नेटवर्क अचानक गायब होते. कधी-कधी नेटवर्क स्विचमध्ये प्रॉब्लम असल्यानेही असं होतं. 5G एरियामध्ये 5G सिग्नल कमकुवत झाले तर फोन ऑटोमॅटिक 4G वर शिफ्ट होऊ शकत नाही आणि नेटवर्क गायब होते.
advertisement
सॉफ्टवेयर किंवा फोनची समस्या
अनेकदा फोनच्या सॉफ्टवेयरमध्येही प्रॉब्लम होतो. ज्यामुळे जुना अपडेट, बग किंवा एयरप्लेन मोड ऑन राहणे, मोबाईल डेटा ऑफ किंवा प्रायव्हेट DNS चुकीचे अशा चुकीट्या सेटिंग्सनेही नेटवर्क डिस्कनेक्ट होते. फोन रिस्टार्ट करणे किंवा एयरब्लेन मोड 10-20 सेकंदांसाठी ऑन-ऑफ केल्याने ते अनेकदा दुरुस्त होते.
advertisement
सिम कार्डचा प्रॉब्लम
सिम कार्ड जुनं असणे, खराब, लूज किंवा डॅमेज असेल तरीही नेटवर्क अचानक गायब होते. सिम काढून स्वच्छ करुन पुन्हा बसवा किंवा दुसऱ्या स्लॉटमध्ये ट्राय करा. तुम्हाला सिम स्वॅपिंग किंवा अॅक्टिव्हेशन प्रॉब्लम असेल तरीही असं होऊ शकतं.
नेटवर्क अचानक गेल्यावर काय करावं?
- लोकेशन बदलून पाहा.
- फोन रिस्टार्ट करा.
- एयरप्लेन मोड 10-15 सेकंदांसाठी ऑन-ऑफ करा.
- मोबाईल डेटा आणि नेटवर्क मोड चेक करा ((4G/5G प्रेफर्ड ठेवा)
- सिम काढून पुन्हा बसवा किंवा दुसऱ्या फोनमध्ये ट्राय करा.
- वारंवार असं होत असल्यास नेटवर्क कंपनीच्या कस्टमर केयरशी संपर्क करा किंवा सॉफ्टवेयर अपडेट चेक करा.
advertisement
जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये या लहान-मोठ्या समस्या दिसतात आणि घरबसल्या दुरुस्तही होतात. पण या समस्या सतत राहिल्या तर कंपनीकडून टॉवर एश्यू किंवा तुमच्या एरियामध्ये कव्हरेज कमी असल्यामुळे हे होऊ शकतं. नीट चेक केल्यास अनेक प्रॉब्लम दूर करता येऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 2:32 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
फोनमध्ये नेटवर्क येत नाही का? 90% लोकांना माहितीच नसतं खरं कारण, लगेच घ्या जाणून







